विविध स्वच्छता स्पर्धा आयोजनातून नागरिकांच्या स्वच्छता संकल्पनांना मुक्त वाव – सुलेखनकार अच्युत पालव
जग बदलतेय तसेच जगाचे चित्र बदलतेय आणि चित्राची भाषाही बदलते आहे. त्यामुळे बदलत्या जगाचे नवे चित्र नव्या पिढीच्या संकल्पनेतून साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत 9500 हून अधिक इतक्या मोठ्या संख्येने मुले सहभागी झाली याचे सुप्रसिध्द सुलेखनकार श्री.अच्युत पालव यांनी कौतुक केले. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी स्वच्छ नवी मुंबई विषयीच्या आपल्या मनातील कल्पना चित्रांकित करून कागदावर मांडल्या ही प्रशंसा करण्यासारखी गोष्ट असल्याचे मत सांगत नवी मुंबईचा नागरिक असल्याचा तुमच्याइतकाच अभिमान मला असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका अशाप्रकारे विविध स्पर्धांच्या आयोजनातून जनतेला स्वच्छता कार्यात सहभागी करुन घेते व त्यांच्या कल्पनांना मुक्त वाव देते ही नवी मुंबईला सतत आघाडीवर ठेवणारी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विविध प्रकारच्या स्वच्छता स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते
या वेळी सुलेखनकार श्री. अच्युत पालव, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल आधिकारी डॉ बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता श्री मनोज पाटील, मुख्य स्वचछता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांच्या शुभहस्ते स्वच्छता स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी निश्चय केला - नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जात असताना आयुक्त महोदय याच्या निर्देशानुसार स्वच्छता उपक्रमांत लोकसहभागावर भर दिला जात असल्याचे सांगत या स्पर्धा हा त्याच ध्येयपूर्तीचा एक भाग असल्याचे सांगितले.
घनकचरा विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी याप्रसंगी बोलताना सर्व स्पर्धांना नागरिकांचा मिळालेला अत्यांत उत्साही प्रतिसाद पाहून नवी मुंबईचे नागरिक स्वच्छतेविषयी किती जागरूक आहेत याचा प्रत्यय येत असल्याचे सांगून आजवरच्या महिनगरपालिकेच्या यशात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा सर्वात मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेने स्वचछ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध स्वच्छता स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
यामध्ये चित्रकला स्पर्धेंत सहभागी 9500 हून अधिक स्पर्धकांतून सागर शशिकांत तांडेल यांनी प्रथम क्रमांक तसेच ईश्वरी दरेकर यांनी व्दितीय व रवीतनया चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
भित्तीचित्र स्पर्धेत संग्राम इंगळे यांनी प्रथम, सुप्रीत शेरीगार यांनी व्दितीय व सिध्दार्थ लोखंडे यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
लघुपट स्पर्धेत अक्षय बल्लाळ यांच्या देजा उ या लघुपटाला प्रथम क्रमांकाचा बहूमान मिळाला तसेच संदीप फुलारी यांच्या दुरबीन या लघुपटाने व्दितीय क्रमांकाचे आणि मुक्तछंद नाटय संस्थेच्या वुई कॅन या लघुपटाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.
जिंगल स्पर्धेत कृष्णा – देवा यांनी प्रथम क्रमांकाचे, सुखदा भावे – दाबके यांनी व्दितीय क्रमांकाचे व सोमनाथ सोनावणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
पथनाटय स्पर्धेमध्ये सत्कर्व संस्थेने प्रथम पारितोषिक त्याचप्रमाणे माध्यमिक विदयालय सेक्टर 2 ऐरोली यांनी व्दितीय क्रमांकाचे व पिव्हीजीएस विदयाभवन शिक्षक संघ नेरुळ यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
या 3 क्रमांकाव्यतिरिक्त सर्व स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.
स्वच्छ हॉटेल स्पर्धेमध्ये रमाडा हॉटेल एम आय डी सी महापे यांनी प्रथम क्रमांकाचे, तुंगा हॉटेल से-30 ए, वाशी यांनी व्दितीय क्रमांकाचे व कंट्री हॉटेल एम आय डी सी महापे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
स्वच्छ नमुंमपा शाळा स्पर्धेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज नमुंमपा शाळा क्र 55, आंबेडकर नगर रबाळे यांनी प्रथम क्रमांकाचे, नमुंमपा शाळा क्र 36 से-19 कोपरखैरणे यांनी व्दितीय क्रमांकाचे व नमुंमपा शाळा क्र 28 सेक्टर 15-16 वाशी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
स्वच्छ खाजगी शाळा स्पर्धेमध्ये विबग्योर हायस्कूल से 8 ए ऐरोली यांनी प्रथम क्रमांकाचे, एपीजे स्कुल से 15 नेरुळ यांनी व्दितीय क्रमांकाचे व अँकरवाला स्कुल से 14 वाशी यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
स्वच्छ गृहनिर्माण संस्था स्पर्धेमध्ये सिध्दीविनायक टॉवर से 5 कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांकाचे, एन आर आय कॉम्प्लेक्स फेज 1 से 54, 56 व 58 सीबीडी बेलापूर यांनी व्दितीय क्रमांकाचे आणि भिमाशंकर सोसायटी, से 19 ए, नेरुळ यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संपादन केले.
स्वच्छ मार्केट स्पर्धेमध्ये श्रमिक जनता फेरीवाला संघटना से 8 कोपरखैरणे यांनी प्रथम क्रमांकाचे, जय भवानी दैनंदिन बाजार से 5 ऐरोली यांनी व्दितीय क्रमांकाचे, दैनंदिन बाजार सानपाडा मार्केट से 4 तुर्भे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाविले.
स्वच्छ शासकीय कार्यालय स्पर्धेमध्ये पोस्ट ऑफिस से 3 नेरुळ यांनी प्रथम क्रमांकाचे, भारतीय स्टेट बँक से 11 सीबीडी बेलापूर यांनी व्दितीय क्रमांकाचे, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, एम आय डी सी कोपरखैरणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाविले.
स्वच्छ हॉस्पिटल स्पर्धेमध्ये एम जी एम हॉस्पिटल से 4 वाशी हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. हरिष हॉस्पिटल से 3 नेरुळ यांनी व्दितीय क्रमांकाचे तसेच लायन्स हॉस्पिटल से 7 कोपरखैरणे यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
विविद कलात्मक स्वच्छता स्पर्धांच्या माध्यमातून आमच्या मनातील नाविन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळते त्यामुळे स्पर्धा आयोजनाबद्दल सहभागी कलावंतांकडून तसेच सहभागी संस्थांकडून उत्तम उपक्रम आयोजनाबद्दल महानगरपालिकेचे अभिनंदन केले व या माध्यमातून नवी मुंबईतील स्वच्छता कार्याला एक वेग प्राप्त झाल्याचे सांगितले.
Published on : 30-12-2022 13:44:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update