ऐरोलीमध्ये प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेत 15 हजार दंड व 7 किलो प्लास्टिक जप्ती
प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा तीव्र करण्यात आल्या असून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार सर्वच विभागांमध्ये मोहीमांना गती देण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून आज घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे व परिमंडळ 2 चे उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर यांनी स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे व स्वच्छता निरीक्षकांसह ऐरोली विभागात अचानक तपासणी सुरू केली.
या तपासणीमध्ये 3 दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळून आल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे 15 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली त्याचप्रमाणे 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. अशाप्रकारच्या धडक मोहीमा सर्वच विभागांमध्ये सुरू आहेत.
Published on : 13-01-2023 14:05:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update