नेरुळ विभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नेरुळ विभागांतर्गत घर क्र. 213, सारसोळे गांव, सेक्टर-6, नेरुळ, याठिकाणी तळमजजा + 4 मजल्याचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे.
सदर अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त तथा नेरुळ विभाग अधिकारी श्री. सुनिल पाटील यांच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ अभियंता श्री. रितेश पुरव यांच्या उपस्थितीत या अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी नेरुळ विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 02 पीकअप व्हॅन, 1 ब्रेकर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 23-01-2023 14:29:40,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update