मुख्य जलवाहिनी दुरुस्तीमुळे 15 मार्चला संध्याकाळी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर कामे करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक 15/03/2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजे पर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा 12 तास बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच गुरुवार दिनांक 16/03/2023 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व कामोठे, खारघर नोड मधील नागरीकांना याव्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
Published on : 13-03-2023 15:10:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update