जून महिन्यातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारीवृंदाचा नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते गौरव
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात महानगरपालिकेच्या अधिकारी - कर्मचारीवृंदाचा महत्वाचा वाटा असून त्यामधील 14 अनुभवसंपन्न अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला ते सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिका मुकणार आहे ही एकप्रकारे महानगरपालिकेची हानी आहे अशा शब्दात मनोगत व्यक्त करीत महापालिका आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारी वृंदाच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या जून महिन्याच्या अखेरच्या दिवशी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचारीवृंदाच्या निरोप समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांचेसमवेत अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले व श्री संजय काकडे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. मंगला माळवे, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता श्री. मनोज पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, विधी अधिकारी श्री. अभय जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आज सेवानिवृत्त होणारे अत्यंत मितभाषी असणारे उपायुक्त श्री. अनंत जाधव यांनी त्यांच्याकडे सोपवलेली कामे नेहमीच प्रामाणिकपणे चांगल्या रितीने पार पाडली. त्याचप्रमाणे स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांचा ईटीसी केंद्राच्या राष्ट्रीय पातळीवरील नावलौकिकात अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करीत आयुक्तांनी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांनी आपापल्या पदावरील काम चोखपणे पार पाडले त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिका इतर शहरांना हेवा वाटावे असे काम करू शकली अशा शब्दात त्यांच्या कामाचा गौरव केला.
यावेळी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते, उपायुक्त श्री. अनंत जाधव, ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, मुख्याध्यापक श्री. आनंदा गोसावी, प्राथमिक शिक्षिका श्रीम. सुलोचना बागम व श्रीम. विद्या कठारे, प्रशासकीय अधिकारी श्री. कांतीलाल ठाकरे, स्वच्छता निरीक्षक श्री. सुधाकर वडजे, ऑक्झिलरी नर्स मिडवाइफ श्रीम. पुष्पा गांगुर्डे व श्रीम. अनिता कुलकर्णी, आरोग्य सहाय्यक श्री. किशोर लखोटे, जोडारी श्री. गोविंद खांडेकर, शिपाई श्री. रवींद्र धुमाळ, सफाई कामगार श्री. अरुण मोरे, श्री राजू भारस्कर श्रीम. हंसा परमार या सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी - कर्मचारीवृंदाचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला.
Published on : 01-07-2023 09:40:51,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update