नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेस उदंड प्रतिसाद



महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांनाही जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने नमुंमपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते उत्साहात शुभारंभ झाल्यानंतर या स्पर्धांमधील बुध्दीबळ स्पर्धा ऐरोली स्पोर्टस असोसिएशन, ऐरोली यांचेकडील इन्डोअर हॉलमध्ये सुनियोजितरित्या संपन्न झाल्या.
या बुध्दीबळ स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षाआतील वयोगटांमध्ये 96 शाळांमधून 720 मुले व 379 मुलींनी उत्साही सहभाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त तथा आंतरराष्ट्रीय ॲथलिट श्रीम. ललिता बाबर यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी त्यांनी स्पर्धेमध्ये उत्साहाने सहभागी होणा-या खेळाडूंचे कौतुक करीत त्यांना स्पर्धेतील उत्तम खेळाकरिता शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे पालक व शिक्षक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. ऐरोली स्पोर्टस असोसिएशनकडून खास करुन क्रीडा विषयक उत्तम व नियोजनबद्ध अशा सुविधा निर्माण करून त्या खेळाडूंना उपलब्ध करुन दिल्या जास असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यावेळी ऐरोली स्पोर्टस असोसिएशनचे सचिव डॉ. हेमंत अनार्थे, सहसचिव श्री. प्रविण पैठणकर व नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.
गतवर्षीच्या तुलनेत बुध्दीबळासह सर्वच स्पर्धांमधील सहभागी विद्यार्थी संख्या वाढत असून यामागे महानगरपालिकेस शालेय क्रीडा स्पर्धांकरिता जिल्ह्याचा दर्जा मिळाला असल्याने व सर्व स्पर्धा महानगरपालिका क्षेत्रातच होत असल्याने स्पर्धकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. शिवाय या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ऐरोली स्पोर्टस असोसिएशन यांचेकडून अत्यंत सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त सभागृह उपलब्ध करुन देण्यात आल्याने खेळाडूंमध्ये उत्तम वातावरणात खेळतानाचा आनंद दिसून येत होता आणि क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व पालकांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या स्पर्धेचा निकाल :-
* 14 वर्षा आतील मुले – (1). विराज राणे- न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली. (2). गौतम विजयकुमार - युरो स्कुल, ऐरोली. (3). अभिनव व्यंकटेश मिश्रा - डी. वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ. (4). ओजस्व कुलकर्णी - फा. ॲग्नल स्कुल, वाशी. (5). हर्षित ललित गुप्ता – डॉन बॉस्को स्कुल, नेरुळ.
* 14 वर्षाआतील मुली – (1). अवनी वैभव गोवेकर- न्यु होरायझन स्कॉलर स्कुल, ऐरोली. (2). सिध्दी दिवटे- डी.ए.व्ही. पब्लिक स्कुल, ऐरोली. (3). जैना ललित धरमसे - न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली. (4). सोनाक्षी पंकज महाजन – न्यू बॉम्बे सिटी स्कुल (सीबीएससी). (5). आर्या विनित पालकर - डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ.
* 17 वर्षा आतील मुले – (1). माधव मेनन - पोदार इंटरनॅशनल स्कुल, नेरुळ. (2). दिव्यांशु रंजन – दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ. (3). समर्थ पाटकर - न्यू होरायझन पब्लिक स्कुल, ऐरोली. (4). आयुष काबरा - एव्हॅलॉन हाइटस स्कुल, वाशी. (5). व्दिज जिग्नेशकुमार गोंडालिया - डी.ए.व्ही.पब्लिक स्कुल. नेरुळ.
* 17 वर्षाआतील मुली – (1). मृगया गोटमारे- फा. ॲग्नल स्कुल, वाशी. (2). अंजु रतन बोगाटी- नमुंमपा शाळा क्र.104, रबाळे, (3). योशिता पाटील- एपीजे स्कुल, नेरुळ. (4). भक्ती विष्णु मांजरेकर – आयईएस नवी मुंबई हायस्कुल, वाशी. (5). समृध्दी पोटरे - एमजीएम स्कुल, नेरुळ.
* 19 वर्षाआतील मुले – (1). श्रीवेद देशमुख - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ. (2). श्रेय निकांत अय्यर - साईनाथ हिंदी हायस्कुल. (3). ओजस शितोळे - फा. ॲग्नल स्कुल, वाशी. (4). यश रमेश काशिद – ज्ञानपुष्प विद्यानिकेतन, सी.बी.डी. (5). एकांश नानगिया - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.
* 19 वर्षाआतील मुली – (1). सौख्या गिरीश सावंत- फा. ॲग्नल स्कुल, वाशी. (2). तन्वी शामराव बोराटे - कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी. (3). इशिता सानसवाल - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ. (4). शर्वरी
प्रशांत मोरे- जयपुरीयार स्कुल. सानपाडा. (5). श्रीनिधी पुरुषोत्तम उदडेमरी - दिल्ली पब्लिक स्कुल, नेरुळ.
या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरावर विजय संपादन केला असून त्यांनी पुढील विभागीय स्पर्धेत मुंबई विभागीय बुध्दीबळ स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला आहे.
या स्पर्धेतून विजयी होऊन पात्र झालेल्या खेळाडूंना महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी अभिनंदन करीत पुढील विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.
Published on : 10-10-2023 15:41:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update