कोव्हिड - 19 आजचे अपडेट (04/05/2020)
l आज 118 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 84 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 34 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 34 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 348
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : बेलापूर - 2, नेरूळ - 3, वाशी - 2, तुर्भे - 2,
कोपऱखैरणे - 10, घणसोली - 6, ऐरोली - 1, दिघा - 8.
l सेक्टर 21 सीवूड्स नेरुळ येथील 75 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यांच्या पत्नीच्या शस्त्रक्रियेदरम्यान करण्यात आलेल्या त्यांच्याही स्वॅब टेस्ट मध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 10 नेरुळ येथील रहिवाशी असणा-या व मुंबईतील गोवंडी येथील न्युमोनिक हेल्थपोस्टवर कार्यरत असणा-या 29 वर्षीय नर्स महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या हेल्थ पोस्टमार्फत मुंबईत घेण्यात आलेल्या कोरोना तपासणी शिबिरात स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती.
l सेक्टर 5 सानपाडा येथील 15 वर्षीय मुलाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यांचे मागील 1 वर्षापासून डायलेसीस सुरु असून त्यादरम्यान करण्यात आलेल्या स्वॅब टेस्टींगमध्ये त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 22 तुर्भेगांव येथील रहिवाशी व मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन टेक्निशियन असणा-या 30 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 22 एप्रिल पासून सदर व्यक्ती हॉस्पिटलमार्फत करण्यात आलेल्या व्यवस्थेनुसार मुंबईतच असून सहकारी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यामध्ये सदर व्यक्तीची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. ते सायन हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहेत.
l सेक्टर 11 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजीमार्केट येथील 60 वर्षीय व्यापारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ते 30 एप्रिल ताप येईपर्यंत मार्केटमध्ये जात होते.
l सेक्टर 11 जुहूगांव येथील यापूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉय यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या आत्तेभावाची 22 वर्षाची पत्नीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉ़झिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l आसाम भवन सेक्टर 30 ए वाशी येथे तात्पुरता निवास असणा-या व कर्करोगावरील उपचारासाठी आसामहून मुंबईत आलेल्या 33 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l आसाम भवन येथे हाऊस किपिंगचे काम करणा-या व सेक्टर 1 ऐरोली नाका येथे रहिवाशी असणा-या 27 वर्षीय युवकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 4 कोपरखैरणे येथील 70 वर्षीय महिलेस एक महिन्यांपूर्वी ताप आल्यानंतर त्यावर उपचार करून बरे वाटू लागले होते. तथापी त्यांस 29 एप्रिल रोजी पुन्हा ताप आल्यानंतर त्यांचे वाशी रुग्णालयात स्वॅब टेस्टींग केले असता कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या ए.पी.एम.सी. दाणा बाजार मध्ये मजूर काम करणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांचे 34 वर्षाचे भाऊ, 60 वर्षाचे वडील, 52 वर्षाची आई आणि 4 वर्षाचा पुतण्या अशा 4 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 9 कोपरखैरणे येथील रहिवाशी व गोवंडी मुंबई येथील किराणा व्यापारी असणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीच्या स्वॅब तपासणीमधून त्यांचे 55 वर्षाचे पुरुष शेजारी यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 10 कोपरखैरणे येथील 36 वर्षीय भाजी विक्रेते यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. 30 एप्रिल रोजी घसा दुखू लागल्याने त्यांची स्वॅब टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 12 ए कोपरखैरणे येथील 18 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह युवतीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीच्या स्वॅब तपासणीमधून तिच्या 43 वर्षीय वडीलांचे आणि 37 वर्षीय आईचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तिच्या वडीलांचे ए.पी.एम.सी. दाणा बाजारमध्ये दुकान आहे.
l आंबेडकर नगर राबाडे येथे वडिलांच्या मृत्युनंतर चुनाभट्टी मुंबईतून आजोळी तात्पुरते राहण्यास आलेल्या 7 वर्षीय मुलीचे व तिच्या 62 वर्षीय आजीचे (आईची आई) कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केट दाणा बाजार येथे काम करणा-या 36 वर्षीय कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांचा डोंबिवली येथे राहणारा सहकारी पॉझिटिव्ह झाल्याने त्यांनी स्वॅब टेस्ट करून घेतली.
l सेक्टर 6 घणसोली येथील रहिवाशी व मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या 29 वर्षीय पत्नीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. दाणा मार्केटमध्ये अकाऊंटंट म्हणून कार्यरत असणा-या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या सेक्टर 11 घणसोली येथे राहणा-या 55 वर्षीय सहकारी व सहका-याच्या 23 वर्षीय नातेवाईकाचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l नामदेव नगर दिघा येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील 35 वर्षीय महिला, 11 वर्षीय व 9 वर्षीय मुले, 14 वर्षीय मुलगी आणि 40 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला तसेच 23 वर्षीय पुरुष अशा 7 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l विटावा पेट्रोलपंपासमोर ऐरोली येथील रहिवाशी व मुंबई मधील हिरानंदानी हेल्थ पोस्ट पवई येथील 35 वर्षीय डॉक्टरांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. ते 2 एप्रिल रोजी ताप येईपर्यंत कामाला जात होते.
l सेक्टर 11 सी.बी.डी. बेलापूर येथील 52 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर महिलेच्या मुलावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु असल्याने त्याच्या सोबत राहण्यासाठी यांचीही तपासणी केली असता त्यांचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 24 जुईनगर येथील रहिवाशी व बी.इ.एस.टी. च्या सांताक्रुझ बस डेपोतील पॉझिटिव्ह कंडक्टरच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या 32 वर्षीय पत्नी व 10 वर्षाचा मुलगा अशा 2 व्यक्तींचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
|