l नवी मुंबईकर नागरिकांसाठी 24 तास कोव्हिड - 19 नियंत्रण कक्ष कार्यान्वित.
कोणत्याही अडचणींसाठी टोल फ्री विनामूल्य क्रमांक - 1800222309 / 1800222310
हेल्पलाईन क्रमांक - 022 - 27567060 / 27567061
l ताप, घसा खवखवणे, सर्दी, श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे असल्यास कॉल सेंटर क्रमांक - 022 - 27567269.
या कॉल सेंटर मधील क्रमांकावर संपर्क साधल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक शंकासमाधान व मार्गदर्शन करणार.
l कोरोनामुळे आलेला ताणतणाव दूर करण्यासाठी मानसोपचार समुपदेशन कक्षाच्या 022 - 35155012 या दूरध्वनी क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने संपर्क साधल्यास मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्याशी संवाद साधणार व त्यांचे मनोबल वाढविणारी अभिनव संकल्पना.
l घरीच क्वारंटाईन असणा-या नागरिकांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी 'कोव्हिगार्ड' मोबाईल ॲपचा प्रभावी वापर. याव्दारे नागरिकांच्या प्रकृतीची महानगरपालिकेच्या डॉक्टरांकडून दररोज नियमित विचारपूस व नागरिकांनाही डॉक्टरांना काही सांगावयाचे असल्यास सुविधा.
l ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह नागरिक सापडतो त्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य जाणून घेण्यासाठी 'कोव्हीकेअर' ॲपचा वापर. याव्दारे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्यस्थिती जाणून घेण्याची सुविधा.
l नवी मुंबईकर नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी टेलिफोनिक आरोग्य सर्वेक्षण केले जात असून नागरिकांच्या मोबाईलवर 022-35155012 या दूरध्वनी क्रमांकावरून फोन येत असून त्यावर सध्याच्या आरोग्य स्थितीविषयी प्रश्न विचारले जात आहेत.
l त्याचप्रमाणे आरोग्य सर्वेक्षणासाठी वेबलिंक https:/forms.gle/1xuKJmg8S6xiWBMu6 प्रसारित केली असून नागरिकांनी या वेबलिंकवर जाऊन आपली आरोग्यविषयक माहिती त्यामध्ये नोंदवावयाची आहे.
l सदर टेलिफोनिक सर्वेक्षण आणि वेबलिक सर्वेक्षणांमध्ये नागरिकांनी नोंदविलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने ताप, घशात खवखव, सर्दी, श्वासोच्छवासास त्रास यापेकी 1 अथवा यापैकी सर्व लक्षणे आढळणा-या नागरिकांशी कंट्रोल रूममधील डॉक्टर संवाद साधून मार्गदर्शन करीत आहेत
l लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये व नागरिक जीवनावश्यक गोष्टींसाठी घरच्या बाहेर पडू नयेत व यातून कोरोना विषाणू प्रसाराला प्रतिबंध व्हावा यादृष्टीने घरपोच किराणामाल, भाजीपाला, फळे पोहचविण्यासाठी "Navi Mumbai Bazzar" (नवी मुंबई बाजार)” हे मोबाईल ॲप कार्यान्वित. महानगरपालिका क्षेत्रातील व्यापारी त्यावर आपले नाव नोंदवू शकतात तसेच नागरिकही आपल्या नजिकच्या दुकानदाराकडून आवश्यक साहित्याची ऑनलाईन ऑर्डर नोंदवून घराबाहेर न पडता घरच्या घरी गरजेचे साहित्य. वस्तू मिळवू शकतात.
l नागरिकांना ताप, घशात खवखव, सर्दी, श्वासोच्छवासास त्रास अशी लक्षणे वाटल्यास त्या बाबतच्या प्राथमिक तपासणीकरिता महानगरपालिकेच्या विविध विभागात असणा-या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी ( सकाळी 9 ते दुपारी 1 वा. ) तसेच नेरुळ, ऐरोली, तुर्भे, बेलापूर येथील रुग्णालयांमध्ये "फ्ल्यू क्लिनिक" सुरू करण्यात आलेले आहेत. याव्दारे प्रामुख्याने ताप, सर्दी, घशात खवखव / खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळणा-या नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून इतर आजारी व्यक्तींची स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे.
l या "फ्ल्यू क्लिनिक" मध्ये कोरोना विषयीची लक्षणे आढळणा-या नागरिकांना कोव्हिड - 19 विषयी तपासणी करण्यासाठी "कोव्हिड केअर सेंटर" याठिकाणी संदर्भित केले जाणार आहे.
l कोरोना विषयीच्या माहिती प्रसारणासाठी 'स्वच्छ नवी मुंबई रेडिओ' ही इंटरनेट रेडिओची अभिनव संकल्पना साकारणारी पहिली महानगरपालिका ( लिंक - www.swachhradionavimumbai.com)
|