कोव्हिड - 19 आजचे अपडेट (30/04/2020)
l आज 13 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
l पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेली विभागनिहाय संख्या : बेलापूर - 3, नेरूळ - 3, वाशी - 3, तुर्भे - 2, दिघा - 2.
l आज 400 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 376 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 24 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 24 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 230
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : वाशी - 6, तुर्भे - 7, कोपऱखैरणे - 3, घणसोली - 1,
ऐरोली - 3, दिघा - 4
l सेक्टर 16, सानपाडा येथील रहिवाशी असणा-या मुंबईतील शताब्दी हॉस्पिटल गोवंडी येथे कार्यरत डॉक्टरांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या सोबतचे डॉक्टर पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या निकटच्या संपर्कातील म्हणून याची कोरोना टेस्ट करण्यात आली.
l सेक्टर 4, सानपाडा येथील रहिवाशी असणा-या व मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे 25 एप्रिल रोजी ताप येईपर्यंत कामावर जाणा-या पोलीस कॉन्स्टेबलचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11 जुहूगांव वाशी येथील 29 वर्षीय युवकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये किचन मधील कर्मचारी आहे.
l सेक्टर 8 ए, ऐरोली येथील 30 वर्षीय युवकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्ती मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय असून त्याठिकाणीच ॲडमिट आहे.
l सेक्टर 14 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या एपीएमसी भाजी मार्केटमधील 50 वर्षीय भाजीपाला विक्रेते यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l शिवाजीनगर बोनकोडे, कोपरखैरणे येथील रहिवाशी एपीएमसी भाजी मार्केटमधील 50 वर्षीय भाजीपाला विक्रेते यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 17 वाशी येथील रहिवाशी व एपीएमसी दाणाबाजार मधील 57 वर्षीय राईस मर्चंट यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16, घणसोली येथील रहिवाशी असणा-या एपीएमसी दाणाबाजार येथे गाळा क्र. जी/9 मध्ये अकाऊन्टन्टचे काम करणा-या 31 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 21, तुर्भे येथील रहिवाशी असणारे एपीएमसी भाजीविक्रेते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सॅम्पल घेतले असता त्यामध्ये त्यांची 45 वर्षीय पत्नी, 23 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी त्याचप्रमाणे सेक्टर 26, वाशी येथे रहिवाशी असणारे त्यांच्या गाळ्यासमोरील गाळ्यातील 39 वर्षीय भाजीविक्रेते अशा 4 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11, जुहूगांव, वाशी येथील रहिवाशी असणा-या फ्लिपकार्ट मधील डिलिव्हरी बॉयच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सँम्पल घेतले असता त्यामधून त्यांची 40 वर्षीय आत्या व 23 वर्षीय आतेभाऊ अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l इंदिरानगर, बंजारावाडी तुर्भे येथील हाऊसकिपींगचे काम करणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील स्वॅब टेस्टींग घेतले असता त्यांची 34 वर्षीय पत्नी आणि 32 वर्षीय मेव्हणा अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l नामदेवनगर, दिघा येथील रहिवाशी असलेल्या व यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या मृत रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब सॅम्पलमधून त्यांची 36 वर्षीय पत्नी तसेच 48 वर्षीय भाऊ व भावाची 46 वर्षीय पत्नी आणि भावाचा 28 वर्षीय मुलगा अशा 4 व्यक्तींचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l यादवनगर ऐरोली येथील रहिवाशी असणा-या 45 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. तिच्या निकटच्या संपर्कातील 5 व्यक्तींचे स्वॅब सँपल घेण्यात आलेले आहेत.
l सेक्टर 8 ए, ऐरोली येथील सोसायटीमध्येच सुरक्षा रक्षक म्हणून काम करणा-या व तेथेच राहणा-या 21 वर्षीय सुरक्षा रक्षकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. पोटाच्या दुखण्यावरील उपचारासाठी ते सायन हॉस्पिटल येथे ॲडमिट असताना त्याठिकाणी त्यांची केलेली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे.
l सेक्टर 14, वाशी येथील 65 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर व्यक्तीच्या घशात खवखव जाणवू लागल्याने त्यांची स्वॅब टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यांचा मुलगा फार्मासिटीकल कंपनीत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
l सेक्टर 10 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या सुरक्षा रक्षक मंडळाच्या 27 वर्षीय सुरक्षा रक्षकाचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयात सदर व्यक्ती 25 एप्रिलपर्यंत कार्यरत होते.
|