कोव्हिड - 19 आजचे अपडेट (08/05/2020)
l आज 5 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह होऊन ब-या झाल्या आहेत व आपल्या घरी परतले आहेत.
l एकूण कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होऊन बरे झालेल्या व्यक्तींची संख्या - 71
l विभागनिहाय बरे झालेले नागरिक संख्या : कोपरखैरणे - 4, नेरूळ - 1
----------------------------------------------------------------
l आज 255 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 212 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 43 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 43 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 527
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : बेलापूर - 06, नेरूळ - 04, वाशी - 07,
कोपऱखैरणे - 06, घणसोली - 12, ऐरोली - 05, दिघा - 03.
----------------------------------------------------------------------
l सेक्टर 16 ए नेरूळ येथील रहिवाशी व मुंबईतील माहीम येथे सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. 22 मार्चपासून घरीच असून 30 एप्रिल रोजी काळबादेवी मुंबई येथे काकांचे निधन झाल्याने त्याठिकाणी ते गेले होते म्हणून त्यांनी स्वत:ची स्वॅब टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l वाशीगांव येथील रहिवाशी व जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे स्टाफनर्स असणा-या 38 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 4 मे रोजी त्यांची जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्वॅब टेस्ट केली असता टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जे.जे. हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करण्यात आलेले आहे.
l सेक्टर 09 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असणा-या 50 वर्षीय व्यक्तीने 3 मे रोजी नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या विशेष तपासणी शिबिरामध्ये स्वॅब टेस्ट केली असता त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l प्रगतीनगर घणसोली येथील रहिवाशी व वाशी सार्वजनिक रुग्णालय येथे नाभीक म्हणून कार्यरत असणा-या 31 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l गोठीवली गांव येथील रहिवाशी असलेले पॉझिटिव्ह व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीच्या स्वॅब तपासणीमधून त्यांच्या शेजारी राहणा-या 08 वर्षीय मुलाचे, 45 वर्षीय महिलेचे व तिच्या 20 वर्षीय मुलाचे, 40 वर्षीय शेजा-याचे व त्यांच्या 35 वर्षीय पत्नी व 15 वर्षीय मुलीचे अशा 06 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 ऐरोली येथील रहिवाशी पॉझिटिव्ह पोलीस कॉन्स्टेबलच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीची स्वॅब टेस्ट घेतली असता त्यांचे मुंबईतील मरोळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत 41 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल सहकारी व सहका-याचा 17 वर्षीय मुलगा अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l नामदेवनगर दिघा येथील मृत पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्यामध्ये 17 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l इलठणपाडा दिघा येथे माहेरी प्रसुतीसाठी आलेल्या 22 वर्षीय महिलेची 06 मे रोजी ऐरोली महापालिका रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर त्यांचे 04 मे रोजी प्रसूतीपूर्वी घेतलेले स्वॅब टेस्ट रिपोर्ट 07 मे रोजी प्राप्त झाले असून त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांस डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल वाशी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.
l संजय गांधीनगर दिघा येथील रहिवाशी असलेल्या 22 वर्षीय महिलेची 4 मे रोजी ऐरोली महापालिका रुग्णालयात प्रसूती झाली असून तिचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांस डेडीकेटेड कोव्हीड हॉस्पिटल वाशी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहे.
l समतानगर ऐरोली येथील सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत पॉझिटिव्ह आया महिलेच्या संपर्कातील व्यक्तीचे स्वॅब टेस्ट घेतली असता त्यामध्ये त्यांची 24 वर्षीय संपर्कातील महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l तेरणा रूग्णालय, नेरूळ येथील स्टाफ क्वार्टर्स मध्ये राहणा-या व नेरूळ 1 येथील महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणा-या 28 वर्षीय महिला डॉक्टरचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 नेरुळ येथील रहिवाशी व महानगरपालिकेमार्फत नेरुळ फेज 1 मध्ये आरोग्य सर्वेक्षण करणा-या 40 वर्षीय महानगरपालिका कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 03 ऐरोली येथील महापालिका रुग्णालयातील स्टाफ नर्सचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 नेरुळ येथील रहिवाशी व अपोलो हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय समाजसेवक म्हणून कार्यरत असणा-या 37 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 04 ऐरोली येथील 20 वर्षीय गरोदर महिला तपासणीसाठी रुग्णालयात गेली असता त्यांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले असून कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 36 करावेगांव येथील रहिवाशी व उलवे येथे वैद्यकीय अधिकारी असणा-या 33 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 28 नेरुळ येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. फळ मार्केटमध्ये व्यापारी असणा-या 54 वर्षीय व्यक्तीचे व त्यांच्या सोबत मार्केटमध्ये काम करणा-या 23 वर्षीय मुलाचे व 20 वर्षीय पुतण्याचे, तसेच 23 वर्षीय मुलीचे अशा 4 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. दाणा मार्केटमध्ये अकाऊंटंटचे काम करणा-या 35 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील विक्रेते असणा-या 57 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 26 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील विक्रेते असणा-या 34 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 15 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. फळ मार्केटमधील विक्रेते असणा-या 43 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 वाशी येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमधील विक्रेते असणा-या 44 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 07 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमध्ये कामगार असणा-या 26 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 17 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. फळ मार्केटमध्ये कामगार असणा-या 48 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 03 कोपरखैरणे येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. भाजी मार्केटमध्ये काम करणा-या 52 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 08 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. फळ मार्केटमधील व्यापारी असणा-या 48 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 01 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. फळ मार्केटमध्ये टेम्पो चालविणा-या 67 वर्षीय चालकाचे व त्याच्यासोबत काम करणा-या 27 वर्षीय मुलाचे अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 09 घणसोली येथील रहिवाशी व ए.पी.एम.सी. मार्केटमध्ये शासकीय लिपिक म्हणून कार्यरत असणा-या 52 वर्षीय कर्मचा-याचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 16 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या 35 वर्षीय डॉक्टर महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 14 कोपरखैरणे येथील रहिवाशी व व्यवसायाने डॉक्टर असणा-या 56 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 20 कोपरखैरणे येथील रहिवाशी व शिवडी पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्टेबल पदी कार्यरत असणा-या 58 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 48 ए नेरुळ येथील रहिवाशी व मुंबईतील गोवंडी येथे क्लिनिक असणा-या 59 वर्षीय डॉक्टरांना मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. ताप असल्याने ते घरीच राहून औषधोपचार घेत होते. त्या दरम्यान त्यांचे राहत्या घरीच 3 मे रोजी निधन झाले असून त्यानंतर मृतदेह सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे आणण्यात आला. त्याठिकाणी मृत्यूनंतर त्यांची स्वॅब टेस्ट घेतली असता त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते पॉझिटिव्ह आलेले आहेत.
l सेक्टर 06 वाशी येथील रहिवाशी असणारे 87 वर्षीय व्यक्ती 2 वर्षांपासून पार्किसन्स या आजाराने ग्रस्त व अंथरूणावरच होते. जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. त्यांना 1 मे रोजी ताप येऊ लागल्याने त्यांची स्वॅब टेस्ट करण्यात आली व कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना वाशी येथील डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचे 8 मे रोजी पहाटे 2 वाजता निधन झाले.
|