सेक्टर 19 कोपरखैरणे कन्टेनमेंट झोन कोव्हीड-19 मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 717 नागरिकांची तपासणी
मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित असलेल्या कोपरखैरणे विभागातील विविध कन्टेनमेंट झोन क्षेत्रात 25 मे पासून मास स्क्रिनींग हाती घेण्यात आले असून यामधून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. आज सेक्टर 19 कोपरखैरणे गांव येथील कन्टेनमेंट क्षेत्रात घेण्यात आलेल्या कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 717 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या 14 नागरिकांचे स्वॅब टेस्टींग करण्यात आले.
कोव्हीड 19 चा प्रसार हा संसर्गातून होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या कोपरखैरणे व तुर्भे विभागातील कंन्टेनमेंट झोनकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे महापे नागरी आरोग्य केंद्र तसेच डॉ.डि.वाय.पाटील रुग्णालय आणि तेरणा रुग्णालय यांच्या 10 डॉक्टरांचा समुह आणि महानगरपालिकेचे स्वयंसेवक पथक यांच्या माध्यमातून हे मास स्क्रिनींग राबविण्यात आले. येथे नागरिकांचे थर्मल स्कॅनींग करण्यात आले व डॉक्टरांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीसंबंधी माहिती जाणून घेतली. आरोग्य तपासणी अंती त्यांना योग्य औषधोपचार देण्यात आला. एखाद्या नागरिकामध्ये तापाची लक्षणे आढळून आल्यास पल्स ऑक्सिमिटरने त्याच्या शरीराची ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली तसेच त्याच्यामध्ये कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्यास स्वॅब टेस्टींग करण्यात आली.
26 मे पासून कोपऱखैरणे विभागात विविध सेक्टरमधील व भागातील कन्टेनमेंट झोनमध्ये सुरु असलेल्या या मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 2500 हून अधिक नागरिकांनी कोव्हीड 19 विषयक आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आहे.
सोमवार 1 जून रोजी कोपरखैरणे विभागात खैरणे भागामध्ये तसेच तुर्भे विभागात तुर्भे स्टोअर भागातील कन्टेनमेंट झोनमध्ये कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येणार आहे. कोव्हीड 19 चा वाढता प्रसार रोखण्यासाठी जास्त संख्येने कोरोनाबाधीत सापडलेल्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून नागरिकांनी मास्कचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सींग राखून सहकार्य करावे असे आवाहन आहे.
Published on : 30-05-2020 17:14:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update