कोव्हिड - 19 आजचे अपडेट (29/04/2020)
l आज सेक्टर 2 कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले असून तो कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे.
l आज 116 कोरोना टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये 98 रिपोर्ट निगेटिव्ह आणि 18 रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त.
l आज पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 18 l एकूण पॉझिटिव्ह नोंदीत रूग्ण संख्या - 206
l विभागनिहाय कोरोना पॉझिटिव्ह नोंदीत संख्या : नेरूळ - 7, वाशी - 2, तुर्भे - 1, कोपऱखैरणे - 4, ऐरोली - 4
l सेक्टर 20 ऐरोली येथील 37 वर्षीय गर्भवती महिला मुलुंड येथील मातृत्व हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर त्यांची स्वॅब टेस्ट घेतली असता त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयात त्यांची प्रसुती सुव्यवस्थितीरित्या सिझरीन पध्दतीने करण्यात आली आहे.
l सेक्टर 22 तुर्भे येथे मागील 3 महिन्यांपासून आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या 22 वर्षीय महिलेची 26 एप्रिल रोजी प्रसुती झालेली असून त्या काळात केलेल्या तपासणीमध्ये त्यांचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांचे आई, वडील ए.पी.एम.सी. मार्केटच्या बाहेर फळे विकण्याचा व्यवसाय करतात.
l ए.पी.एम.सी. मार्केट येथील दाणा बाजारमध्ये एकाच गाळ्यात काम करणा-या 30 वर्षीय सेक्टर 26 वाशी येथील, 33 वर्षीय सेक्टर 12 बी कोपरखैरणे येथील तसेच 30 वर्षीय सेक्टर 11 कोपरखैरणे येथील 3 युवकांना कोरोनाची लागण झाली असून ते ज्या गाळ्यात काम करतात त्याठिकाणी मुलुंड येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर कामासाठी आल्याने व त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने यातील 2 युवकांना ताप येऊ लागल्याने या तिघांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली. त्यामध्ये या तिघांचेही कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l सेक्टर 11 कोपरखैरणे येथील 35 वर्षीय गर्भवती महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्या नियमित तपासणीसाठी कोपरखैरणे येथे मॅटर्निटी होममध्ये गेले असता त्यांची स्वॅब सँपल टेस्टींग करण्यात आल्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्या हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटलमधील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या शेजारी राहणारी व्यक्ती ए.पी.एम.सी. मसाला मार्केट येथे कामाला जात आहे.
l समता नगर ऐरोली येथे रहिवाशी असणा-या व सायन हॉस्पिटल मुंबई येथे आया म्हणून कार्यरत असणा-या 40 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत व त्या सायन हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत.
l सेक्टर 19 ए कोपरखैरणे येथील रहिवाशी असणा-या मुंबईतील देवनार आगारात बी.इ.एस.टी. कंटक्टर म्हणून कार्यरत असणा-या 35 वर्षीय व्यक्तीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांचा कामोठे येथे राहणारा सहकारी ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्याच्या निकटवर्तीय संपर्कातील म्हणून सदर व्यक्तीचे स्वॅब सँपल तपासणी करण्यात आले होते.
l सेक्टर 3 नेरुळ येथे निवासी असलेल्या 30 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. सदर महिलेची प्रसुती 6 एप्रिल रोजी झालेली असून कुर्ला मुंबई येथे राहणारे त्यांचे काका कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या निकटवर्तीय संपर्कातील व्यक्ती म्हणून या महिलेची टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या महिला व त्यांची 59 वर्षाची आई अशा 2 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या नवजात मुलीचे कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.
l शिरवणेगांव येथील घरकाम करणा-या 38 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय व 15 वर्षीय मुले आणि 21 वर्षीय पुतणी अशा 4 व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यांना सर्दी व तापाची लक्षणे जाणवल्याने शिरवणे नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेले असताना त्यांची लक्षणे पाहून त्यांचे स्वॅब सँपल घेतले असता चारही व्यक्तींचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या पतीचेही स्वॅब सँपल घेण्यात आलेले आहे.
l सेक्टर 24 जुईनगर येथील रहिवाशी असलेल्या मुंबईतील भाभा हॉस्पिटल कुर्ला येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणा-या 43 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्या मार्चपासून हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेल्या निवास व्यवस्थेच्या ठिकाणीच मुंबईत राहात असून त्यांचे 3 सहकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उर्वरीत कर्मचा-यांची तपासणी केली असता त्यामध्ये यांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत व त्यांना तेथेच ॲडमिट करण्यात आलेले आहे.
l सेक्टर 20 ऐरोली येथील 36 वर्षीय महिलेस 23 एप्रिल रोजी ताप यायला लागल्यामुळे त्या ऐरोली रुग्णालयातील फ्ल्यु क्लिनिक मध्ये तपासणीसाठी आल्या असता त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात आले असून कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत व त्या डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयातील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये ॲडमिट आहेत.
l सेक्टर 11 जुहुगांव येथील 35 वर्षीय महिला डायलेसीस करीता हिरानंदानी हॉस्पिटल येथे गेली असतना तिची कोरोना टेस्ट केली असता टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत.
l दिवागांव ऐरोली येथील रहिवाशी असणा-या मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स असणा-या 43 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झालेले असून त्यांना सायन हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करण्यात आलेले आहे.
|