*2 दिवंगत कर्मचारी वारसांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन सानुग्रह अनुदानाचे धनादेश प्रदान*
29 सप्टेंबर 2018 रोजीच्या शासन निर्देशान्वये 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या तसेच परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना याचा सदस्य असणा-या कर्मचा-याचा 10 वर्षे सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास, त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीस रु.10 लक्ष इतकी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यात येते.
त्यास अनुसरून नमुंमपा सेवेत 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीत लिपिक टंकलेखक पदावर कार्यरत दिवंगत कै. दुर्वेश प्रेमनाथ भोईर यांच्या मातोश्री श्रीम. रंजना प्रेमनाथ भोईर तसेच अग्निशामक कै. गौतम तुकाराम बागुल यांच्या पत्नी श्रीम. रंगीता गौतम बागुल यांस प्रत्येकी रु.10 लक्ष रक्कमेचा धनादेश सानुग्रह अनुदानापोटी अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या हस्ते, प्रशासन विभागाचे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
Published on : 14-05-2021 14:36:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update