*2 जानेवारीला संपादिका, लेखिका श्रीम. राही भिडे यांचे 'सावित्रीबाईंच्या वाटेवरून पुढे जाताना...' विषयावर व्याख्यान*
भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि महात्मा जोतिराव फुले यांच्यासह सामाजिक समतेच्या पुरस्कर्त्या, थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी रोजीच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 2 जानेवारी 2023 रोजी ऐरोली, सेक्टर 15 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने सेक्टर 15, ऐरोली येथे उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचारसूत्रावर आधारित वाड्.मयीन स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जात आहे. या ठिकाणी महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून नामवंत वक्त्यांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात येतात, ज्याला नागरिकांचा नेहमीच उदंड प्रतिसाद लाभलेला आहे.
याच धर्तीवर ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार दि. 2 जानेवारी 2023 रोजी, सायं. 6 वा., सुप्रसिद्ध लेखिका, संपादिका श्रीम. राही भिडे यांचे 'सावित्रीबाईंच्या वाटेवरून पुढे जाताना ...' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. तरी श्रोत्यांनी व विशेषत्वाने महिलांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार वारसा पुढे नेण्याकरिता हे व्याख्यान अनुभवण्यासाठी सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 03-01-2023 15:05:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update