स्वच्छ सर्वेक्षण 2020 मधील तृतीय क्रमांकाच्या राष्ट्रीय मानांकनासह यावर्षी प्रथम क्रमांकाचा निर्धार

'स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत 'स्वच्छ सर्वेक्षण 2020' मध्ये देशात तृतीय व राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस लाभले. कोव्हीड प्रादुर्भावाच्या काळात सदर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला होता. सदर पारितोषिक स्वरूपातील महात्मा गांधी यांची प्रतिकृती असणारे स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्राची फोटोफ्रेम तसेच फाईव्ह स्टार गार्बेज फ्री सिटीचे सन्मानपत्र आणि ओडीएफ डबल प्लस सिटीचे सन्मानपत्र नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष प्राप्त झालेले आहे.
सदर पारितोषिकांसह महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर तसेच अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ उपआयुक्त श्री. अमरिश पटनिगेरे आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी वर्गाचे समुह छायाचित्र महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे काढण्यात आले.
याप्रसंगी आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या मानांकनात येथील स्वच्छताप्रेमी नागरिकांचा सर्वात महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले. तसेच यावर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये गतवर्षीचे मानांकन उंचावून देशात सर्वोत्तम स्वच्छ शहराचा बहुमान संपादन करण्याचे 'निश्चय केला - नंबर पहिला' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूर्ण क्षमतेने एकत्र मिळून प्रयत्न करूया असा निर्धार व्यक्त केला.
Published on : 15-01-2021 07:55:13,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update