*25 मे रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन*
मंगळवार दि. 25 मे 2021 रोजी मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांमध्ये मंगळवार दि. 25 मे 2021 रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.
तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे व खारघर नोडमधील नवी मुंबई महानगरपालिकेकडून होणारा पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच बुधवार दि. 26 मे 2021 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावयाची आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 24-05-2021 11:39:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update