*25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन संपन्न*
नवी मुंबई महानगरपलिका कार्यक्षेत्रात दिनांक 25 एप्रिल हे जागतिक हिवताप दिन” साजरा करण्यात येतो. हिवतापा विषयी नागरीकांमध्ये जागृती निर्माण होणे करीता विविध उपक्रम राबविण्यात आले. हिवतापा विषयक प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणी साठी जनतेचा सक्रीय सहभाग प्राप्त करुन घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
दि. 25 एप्रिल 2022 रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त हिवताप रोगाचा प्रसार कमी करण्यासाठी व लोकांचे प्राण वाचविण्यासाठी नवीन संकल्पनांचा वापर करु, हिवतापाला दुर करु या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग व उज्जीवना फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 7.30 वा. वाशी से. 29 ते से.17 पर्यंत हिवताप विषयक जनजागृती करीता हिवताप माहिती संबंधित रथ तयार करुन त्यावर प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. तसेच करिअर अकॅडमी, पोलिस प्रशिक्षणार्थी नेरुळ/ एन सी सी विद्यार्थ्यी, आय सी एल व मॉडर्न कॉलेज वाशी येथील विद्यार्थ्यी वैद्यकिय अधिकारी, यांच्या सायकल रॅलीचे व ई बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली मध्ये आरोग्य सहाय्यक, एम पी एच डब्ल्यु, तांत्रिक पर्यवेक्षक, सर्व फवारणी व धुरिकरण कर्मचारी यांचा समावेश होता. तदनंतर वाशी से. 17 शिवाजी चौक येथे सकाळी 9.30 वाजता आय सी एल शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्य सादर करण्यात आले व गोंधळ व वासुदेव या माध्यमाद्वारे हिवताप विषयक जनजागृती प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला.
जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधुन उज्जीवना फाऊंडेशन व नवी मुंबई महानगपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा भवन, वाशी येथे दु.2.00 वाजता वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, एम पी एच डब्ल्यु व क्षेत्रीय फवारणी कर्मचा-यांकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता डॉ. महेंद्र जगताप, महाराष्ट्र शासन जीवशास्त्रवेत्ता यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान केले. सदर कार्यक्रमांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर हिवताप नियंत्रणा करीता उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक एम पी एच डब्ल्यु, तांत्रिक पर्यवेक्षक व फवारणी कामगार यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,घणसेाली यांना हिवताप नियंत्रणाचे उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत हिवताप विषयक जनजागृती होणेकरीता दि. 26 एप्रिल 2022 ते 02 मे 2022 या कालवधीत 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात आरोग्य रथ फिरणार असून सदर आरोग्य रथाचे उद्घाटन मा. अतिरिक्त आयुक्त (2) यांच्या हस्ते दि. 26 एप्रिल 2022 करण्यात आले. सदर आरोग्य रथामध्ये मायकींग व प्रात्यक्षिक संचाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
Published on : 26-04-2022 14:52:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update