सेक्टर 26 कोपरीगांव व ईश्वरनगर, दिघा भागात मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये 2 हजाराहून अधिक नागरिकांची कोव्हीड-19 तपासणी

कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागांमध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळून येत आहेत अशा ठिकाणी महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ .यांच्या मार्गदर्शनानुसार मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत असून आज सेक्टर 26 कोपरीगांव आणि ईश्वरनगर, दिघा येथील कोव्हीड 19 तपासणी शिबिरात 2 हजारहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आले.
तुर्भे विभागात सेक्टर 26 कोपरीगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये महानगरपालिकेचे पावणे नागरी आरोग्य केंद्र तसेच तेरणा रूग्णालय, नेरूळच्या वैद्यकीय पथकांमार्फत मास स्क्रिनींग पार पडले. यामध्ये 198 नागरिकांची कोव्हिड 19 च्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली व त्यामधील कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 5 नागरिकांचे त्वरित स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
अशाच प्रकारे दिघा विभागात ईश्वरनगर येथील मास स्क्रिनींग कॅम्पमध्ये इलठणपाडा नागरी आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांसह अमृत सेवाभावी संस्थेच्या वैद्यकीय पथकाने 2038 नागरिकांचे मास स्क्रिनींग केले त्यामधील कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या 4 नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.
उद्या 5 जून रोजी कोपरखैरणे विभागात सेक्टर 5 येथील कन्टेनमेंट झोनमध्ये तसेच सेक्टर 21 तुर्भे आणि ईश्वरनगर दिघा येथील कन्टेनमेंट झोनमध्येही कोव्हीड 19 मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मास स्क्रिनींग ही प्रभावी उपाययोजना असून सर्वच विभागांत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरी प्रत्येक नागरिकाने मास्कचा नियमित वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करून कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवावे आणि आपले नवी मुंबई शहर लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी व्यक्तिगत पुढाकार घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 04-06-2020 14:52:43,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update