सेक्टर 5 सानपाड्यात बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपुजन

सर्व स्तरातील नवी मुंबईकर नागरिकांना उत्तम सुविधा पुरविण्याची बांधिलकी जपत महानगरपालिका काम करीत असून सानपाडा विभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच 40 प्लसची अभिनव संकल्पना राबविणारे क्रिकेटपट्टू यांच्यासाठी चांगली वास्तू उभी रहात असून त्याचा उपयोग येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सानपाडा सेक्टर 5 येथे भूखंड क्रमांक 515 ए व 515 बी याठिकाणी उभारण्यात येत असलेल्या महिला सक्षमीकरण केंद्र, 40 प्लस क्रिकेट कार्यालय तसेच ज्येष्ठ नागरिक केंद्र इमारत भूमिपूजन समारंभाप्रसंगी महापौर आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर, स्थानिक नगरसेविका श्रीम. कोमल वास्कर, नगरसेवक श्री. सोमनाथ वास्कर, कार्यकारी अभियंता श्री. मनोज पाटील, 40 प्लस क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक मास्टर प्रदिप पाटील, सचिव श्री. लिलाधर पाटील, श्री. विकास मोकल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सानपाडा सेक्टर 5 येथील भूखंड क्रमांक 515 ए व 515 बी याठिकाणी 637.62 चौ.मी. भूखंड क्षेत्रफळावर तीन मजली आऱ.सी.सी. इमारत उभी राहत असून त्यामध्ये लिफ्टची सुविधा असणार आहे.
Published on : 06-03-2020 13:38:45,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update