*5 डिसेंबरला डॉ.भालचंद्र मुणगेकर व्याख्यानातून बाबासाहेबांना नवी मुंबईत वाहणार वैचारिक आदरांजली*

‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या विचाराप्रणालीवर आधारित ‘ज्ञानस्मारक’ म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक नावाजले जात आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वेगवेगळ्या विषयांवर सातत्यपूर्ण आयोजित करण्यात येणा-या व्याख्यानांमुळे वैचारिक जागर होत आहे.
अशाच प्रकारे 6 डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 5 डिसेंबर 2022 रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, सुप्रसिध्द विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे..
तरी ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतींना वैचारिक अभिवादन करण्यासाठी सोमवार, दि.5 डिसेंबर 2022 रोजी, सायं. 7 वा. ‘विचारवेध’ या उपक्रमांतर्गत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासारख्या नामांकित वक्त्याकडून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील आधुनिक भारत जाणून घेण्यासाठी श्रोत्यांनी सेक्टर 15, ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-12-2022 11:13:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update