*विशेष लसीकरण सत्रात 53 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घेतला प्रिकॉशन डोस*

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" देण्यास सुरूवात झालेली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 69,835 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतलेला असून 100 टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.
या अनुषंगाने पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) म्हणून महत्वाची कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी घ्यावयाचा तिसरा डोस अर्थात प्रिकॉशन डोस विहित कालावधीत घ्यावा यादृष्टीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 53 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी प्रिकॉशन डोस तसेच एका पोलीस कर्मचा-याने कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला.
आत्तापर्यंत 13 लाख 75 हजार 11 नागरिकांनी पहिला डोस, 12 लाख 27 हजार 694 नागरिकांनी दुसरा डोस तसेच 69 हजार 835 नागरिकांनी तिसरा म्हणजेच प्रिकॉशन डोस घेतलेला आहे.
लाभार्थी
|
पहिला डोस
|
दुसरा डोस
|
प्रिकॉशन डोस
|
आरोग्य कर्मी (HCW)
|
34507
|
23103
|
9450
|
पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW)
|
30880
|
22098
|
9171
|
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक
|
100220
|
101338
|
36070
|
45 ते 60 वयोगटातील नागरिक
|
245372
|
235721
|
15144
(18 ते 59 वयोगट)
|
18 ते 45 वयोगटातील नागरिक
|
844083
|
752762
|
-
|
15 ते 18 वयोगटातील नागरिक
|
80800
|
64448
|
-
|
12 ते 14 वयोगटातील नागरिक
|
39149
|
28224
|
-
|
शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड लसीकरणामध्ये पहिल्या व दुस-या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात नवी मुंबई नंबर वन शहर ठरले. तसेच 15 ते 18 आणि 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या प्रमाणातही नवी मुंबई आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे तिस-या प्रिकॉशन डोसकडेही प्राधान्याने लक्ष दिले जात असून लाभार्थ्यांनी विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाव्दारे कोव्हीडचा प्रकृतीवर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होते हे लक्षात घेऊन विहित वेळेत प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-06-2022 16:06:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update