पाचव्या दिवशी 5414 श्रीगणेश मूर्तींचे ‘पुढच्या वर्षी लवकर’ च्या गजरात विसर्जन
*दीड दिवसांचा श्रीगणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाल्यानंतर महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने पाचव्या दिवशीचे श्रीगणेशमूर्ती विसर्जन सुयोग्य रितीने पार पाडण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली होती. त्या अनुषंगाने पाचव्या दिवशीच्या विसर्जनप्रसंगी 22 नैसर्गिक व 134 कृत्रिम अशा 156 विसर्जन स्थळांवर श्रीगणरायाच्या 5414 मूर्तींचे विसर्जन सुव्यवस्थित रितीने पार पडले.
*नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 22 पारंपारिक विसर्जन स्थळांवर 2865 घरगुती व 70 सार्वजनिक अशा पाच दिवसांच्या 2935 श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन संपन्न झाले.* यामध्ये बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 993 घरगुती व 20 सार्वजनिक, नेरुळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 473 घरगुती व 11 सार्वजनिक, वाशी विभागातील 2 विसर्जन स्थळांवर 365 घरगुती व 10 सार्वजनिक, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 260 घरगुती व 6 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 216 घरगुती व 7 सार्वजनिक, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 217 घरगुती व 12 सार्वजनिक, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 229 घरगुती व 4 सार्वजनिक, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 112 घरगुती अशा एकूण 2865 घरगुती व 70 सार्वजनिक अशाप्रकारे एकूण 2935 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
यावर्षीही महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. *नागरिकांनी जलप्रदूषण रोखण्यासाठी या कृत्रिम विसर्जन तलावांवर विसर्जन करून पर्यावरणशीलता जपावी या आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 134 कृत्रिम तलावात साधारणपणे नैसर्गिक विसर्जन तलावांइतकेच म्हणजे 2464 घरगुती व 15 सार्वजनिक अशा पाच दिवसाच्या एकूण 2480 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले* यामध्ये - बेलापूर विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 136 घरगुती व 2 सार्वजनिक, नेरूळ विभागात – 24 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 181 घरगुती, वाशी विभागात –16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 171 घरगुती व 2 सार्वजनिक, तुर्भे विभागात – 17 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 259 घरगुती व 8 सार्वजनिक, कोपरखैरणे विभागात – 15 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 521 घरगुती, घणसोली विभागात - 18 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 584 घरगुती, ऐरोली विभागात – 16 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 437 घरगुती व 3 सार्वजनिक व दिघा विभागात – 9 कृत्रिम विसर्जन स्थळांवर 175 घरगुती अशाप्रकारे एकूण 134 कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये 2464 घरगुती व 15 सार्वजनिक अशा एकूण 2480 श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले.
*अशाप्रकारे पाच दिवसांच्या विसर्जन प्रसंगी 5329 घरगुती व 85 सार्वजनिक अशा एकूण 5414 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.*
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 22 विसर्जन स्थळांपैकी मुख्य 14 विसर्जन तलांवांमध्ये गॅबीयन वॉलची वैशिष्ट्यपूर्ण रचना असून त्याच क्षेत्रात भाविकांनी श्रीमुर्ती विसर्जन करून जलप्रदूषण टाळावे व जैवविविधतेचे संरंक्षण करावे या आवाहनासही चांगला प्रतिसाद लाभला. परिमंडळ उपआयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त तसेच विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, लाईफगार्डस् व अग्निशमन दल दक्षतेने कार्यरत होते. श्रीमूर्तींच्या विसर्जनासाठी तराफ्यांची तसेच आवश्यक त्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था होती. पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सुरक्षेची काळजी घेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आलेली होती.
22 मुख्य विसर्जन स्थळे व 134 कृत्रिम तलाव अशा 156 विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. त्याची वाहतुक निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत स्वतंत्र निर्माल्य वाहनाव्दारे करण्यात येत असून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
अशाचप्रकारे 6 सप्टेंबर रोजी गौरीसह श्रीगणेश विसर्जन असल्याने मोठ्या प्रमाणावर गौरींसह श्रीमूर्तींचे विसर्जन होणार आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा अधिक सतर्कतेने कार्यरत असणार आहे.
Published on : 05-09-2022 15:03:15,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update