*वाशीगांव परिसरातील 354 झोपड्या निष्कासनाची धडक कारवाई*

वाशीगांव सेक्टर- 31 (कांदळवन / खारपुटी) येथे बेकायदेशीर / अनधिकृत झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. तसेच वाशीगांव परिसरातील वन विभाग व नमुंमपाच्या जागेवरही अनधिकृत झोपडया वसलेल्या आहेत. केरळ भवन ते वाशी हायवेपर्यंत उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर तसेच वाशीगांव खाडीकिना-या लगत उभारण्यात आलेल्या या झोपडया हटविणेबाबत वन विभाग, पोलीस प्रशासन तसेच नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली.
या धडक मोहिमेत 354 इतक्या मोठ्या संख्येने अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या तोडक मोहिमेसाठी वन विभागाचे अधिकारी, वन विभागाचे सुरक्षा रक्षक, तसेच तुर्भे / वाशी / सानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी / कर्मचारी तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक, वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, सुरक्षा रक्षक, 16 मजूर यांनी 8 जेसीबी आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने झोपड्या निष्कासनाची मोहिम पार पाडली. यापुढील काळात अशाच प्रकारच्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण विरोधी कारवाया तीव्रतेने सुरु राहणार आहेत.
Published on : 24-11-2022 10:50:28,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update