04 नोव्हेंबर रोजी दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्धतेची अंतिम यादी होणार प्रसिध्द
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करुन देण्याकरीता महानगरपालिकेने दिव्यांगाकडून दि.11 फेब्रुवारी 2019 व दि.06 जून 2019 रोजी वृत्तपत्रात जाहीरात देऊन अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादीस मा.महापालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र.1521, दि.20/12/2019 अन्वये मंजूरी दिलेली आहे. सदर प्रतिक्षा यादी अंतिम करण्याकरीता अर्जदाराकडून दि.27 जून 2022 पासून दि.12 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत हरकती सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. सदर हरकती / सूचनेनंतर अंतीम यादी नमुंमपा, मुख्यालय तळ मजला मालमत्ता विभाग, सर्व विभाग कार्यालये व वेबसाईटवर दि.04 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.
सदर अंतिम यादीतील दिव्यांग व्यक्तींना सोडतीद्वारे स्टॉल वितरीत करण्याची प्रक्रिया गुरुवार दि.10 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता विष्णुदास भावे नाटगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सोडतीच्या वेळी अर्जदार यांनी ओळख पटविणेकरीता आधारकार्ड / पॅनकार्ड सोबत आणणे बंधनकारक राहील. तसेच अर्जदारासोबत केवळ आवश्यकता असल्यास दिव्यांग व्यक्तीकरीता एका मदतनीस व्यक्तीस प्रवेश दिला जाईल असे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सूचित करण्यात येत आहे.
Published on : 03-11-2022 13:43:12,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update