12 मार्चला सायक्लोथॉन मध्ये सहभागी होत नवी मुंबईकर करणार माझी वसुंधरा अभियानाचा गजर
माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील राज्यातील नंबर वन पर्यावरणशील शहराचे मानाकन यावर्षी माझी वसुंधरा अभियान 3.0 मध्ये कायम राखण्यासाठी महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 5 मार्च रोजी काही अपरिहार्य कारणास्तव त्यादिवशी स्थगीत करण्यात आलेली सायक्लोथॉन आता रविवार दि. 12 मार्च 2023 रोजी संपन्न होत आहे.
पामबीच मार्गावर सकाळी 7 वाजल्यापासून मोराज सर्कल सानपाडा ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सीबीडी बेलापूर या दरम्यान ही 8 कि.मी. अंतराची सायक्लोथॉन 2023 ही नवी मुंबई महानगरपालिका आणि सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असून यामध्ये सर्व सहभागी सायकलपटूंना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
यापूर्वी 5 मार्च रोजीच्या नियोजित सायक्लोथॉनमधील सहभागाकरिता ज्यांनी आपली नावे नोंदणी केली असतील त्यांना 12 मार्च रोजीच्या सायक्लोथॉन सहभागाकरिता पुन्हा नावे नोंदविण्याची आवश्यकता असणार नाही असे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले असून नव्याने स्पर्धा सहभाग घ्यावयाचा असल्यास https:/docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuw4OkJ7v2UIhhQIxOeUUOOxCh66O3rkWZER9PWugkkEEqWA/viewform या लिंकवर आपल्या नावाची पूर्वनोंदणी करता येऊ शकते. सहभाग घेण्याकरिता स्वत:ची सायकल आणावयाची आहे.
या उपक्रमामध्ये वय वर्षे 12 ते 25 असा पहिला गट तसेच वय वर्षे 25 पुढील दुसरा गट असणार आहे. सायकल हे प्रदूषणविरहित वाहन आरोग्य रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने लाभदायक असून यामुळे पर्यावरणाचीही जपणूक होते. त्यामुळे सायकलच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासाठी सायक्लोथॉन 2023 या अभिनव उपक्रमाचे रविवार दि. 12 मार्च 2023 रोजी आयोजन करण्यात आले असून नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा माझी वसुंधरा अभियान 3.0 च्या नमुंमपा नोडल अधिकारी श्रीम. सुजाता ढोले यानी केले आहे.
Published on : 10-03-2023 13:13:20,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update