31 जानेवारीपर्यंत दाखल करावेत दिव्यांग योजनांसाठीचे अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी – केंद्रामार्फत सन 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये नमुंमपा क्षेत्रामध्ये वास्तव्य करणा-या दिव्यांग मुले, व्यक्ती व त्यांच्या कुटूंबीयाकरीता विविध दिव्यांग योजना राबविण्यात येत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग 6चे योग्य पालन व्हावे तसेच सद्या् परिस्थितीमध्ये दिव्यांग व्यक्तींना सतत प्रवास करणे शक्य नसल्यामुळे सदर योजनेचे पीडीएफ अर्ज www.nmmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
विविध दिव्यांग योजनांचे अर्ज सकाळी 11.00 ते संध्याकाळी 04.00 वा. पर्यंत (शासकीय सुट्या वगळून) नमुंमपा ईटीसी – केंद्रामध्ये देखील उपलब्ध होतील. तथापि, सोशल डिस्टंसिंगचे जास्तीत जास्त पालन करुन, नमुंमपा क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींनी लवकरात लवकर अर्ज भरुन याचा लाभ घ्यावा याबाबतचे आवाहन नमुंमपा ईटीसी – केंद्रामार्फत करण्यात येत आहे. विविध दिव्यांग योजनांचे अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2021 अशी आहे.
Published on : 22-01-2021 11:01:14,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update