5 जानेवारीला 'एक पाऊल स्वच्छतेसाठी' म्हणत धावणार नवी मुंबई महापौर मॅरेथॉन
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्टर्लिंग इन्स्टिटयुट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने “नवी मुंबई महापौर मॅरेथॉन” (“NAVI MUMBAI MAYOR MARATHON) In Association With STERLING NAVI MUMBAI UNITED RUN Orgnized by SMART CONCEPTZ आयोजित करण्यात येत आहे. “एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी” हा संदेश प्रसारित करीत रविवार, दि. 5 जानेवारी 2020 रोजी सेक्टर 15 ए, सी.बी.डी. बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरुन ही मॅरेथॉन पाम बीच मार्गावर आ्रयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी., 5 कि.मी. फन रन अशी पुरूष व महिला गटात राज्य स्तरावर आयोजित करण्यात येत असून यामध्ये सहभागी होण्यासाठी bit.ly/mayormarathon याव्दारे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य राहणार आहे. ऑनलाईन प्रवेश नोंदवून सहभाग घेणा-या सर्व स्पर्धंकांना टी शर्ट व अनुषंगिक कीट तसेच सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात येणार आहे.
त्यासोबतच या मॅरेथॉनमध्ये नवी मुंबईमधील शालेय 17 वर्षाआतील मुला-मुलींकरीता स्वतंत्र 3 कि.मी. व 14 वर्षाआतील मुला-मुलींकरीता स्वतंत्र 2 कि.मी. रनचे आयोजन करण्यात येत असून याकरिता स्व.राजीव गांधी स्टेडियम, सेक्टर 3 ए, सी.बी.डी. बेलापूर येथे ऑफलाईन प्रत्यक्ष अर्ज सादर करुन सहभागी होता येईल. यामध्येही सहभागी सर्वांना टी शर्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. मॅरेथॉनमधील विजेत्या स्पर्धकांना एकुण रु.3.84 लक्ष इतकी रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या नवी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत 'एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी' असा संदेश प्रसारीत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार व आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 18-12-2019 12:42:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update