*10 हजाराहून अधिक पोटँशिअल सुपरस्प्रेडर्सनी घेतला कोव्हीड लसीकरणाचा लाभ*

कोव्हीड लस उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित व्हावेत यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याकरिता लसीकरण केंद्र संख्येतही लक्षणीय वाढ करीत महानगरपालिकेची 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे.
अशाप्रकारे व्यापक स्वरूपात नियोजनबध्द लसीकरण केले जात असताना सेवा पुरविताना नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात संपर्कात येत असल्याने कोव्हीडच्या दृष्टीने जोखमीच्या असलेल्या पोटँशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार विविध सेवा क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींसाठी विशेष लसीकरण सत्रांचे 25 जूनपासून आयोजन केले जात आहे.
यामध्ये आत्तापर्यंत -
तपशील
|
लाभार्थी
|
* मेडिकल स्टोअर्स मधील कर्मचारी
|
421
|
* रेस्टॉरन्टमधील कर्मचारी
|
2705
|
* सलून / ब्युटी पार्लर मधील कर्मचारी
|
771
|
* पेट्रोल पंप वरील कर्मचारी
|
317
|
* स्वच्छता, स्वयंपाक व इतर घरकाम करणारे कामगार
|
1236
|
* रिक्षा - टॅक्सी चालक
|
3037
|
* सोसायटी वॉचमन
|
1773
|
* घरगुती गॅस वितरण कर्मचारी
|
198
|
* टोल नाका वरील कर्मचारी
|
139
|
एकूण
|
10597
|
*अशाप्रकारे एकूण 10 हजार 597 पोटॅशिअल सुपरस्प्रेडर्स व्यक्तींनी कोव्हीड लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे.*
*आज महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली अशा तिन्ही रूग्णालयात या सेवा क्षेत्रांतील याआधीच्या लसीकरण सत्रात लसीकरण न झालेल्या उर्वरित व्यक्तींसाठी आयोजित लसीकरण सत्राचा लाभ 1022 व्यक्तींनी उत्साहाने घेतला.*
तरी या सेवा क्षेत्रातील लसीकरण न झालेल्या व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे याची दक्षता घ्यावी तसेच चेह-याला स्पर्श न करणे, वारंवार हात धुवून स्वच्छ राखणे, सुरक्षित अंतर राखणे हे कोव्हीड वर्तन नियम आपली नियमित सवय बनवावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 06-08-2021 15:01:22,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update