नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सर्व शिक्षकांसाठी दि. 30 डिसेंबरपासून निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन चार टप्प्यात करण्यात आले होते. त्यापैकी शेवटचा टप्प्याचे प्रशिक्षण नमुंमपा शाळा क्र. 76, घणसोली येथे दिनांक 20 जानेवारी 2020 पासून सुरू आहे. या निष्ठा प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी तथा उपआयुक्त श्री नितिन काळे व विस्तार अधिकारी श्रीम. रूतिका संखे यांनी भेट दिली. याप्रसंगी उपस्थित 160 निष्ठा प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन शिक्षणाधिकारी यांनी मार्गदर्शनपर भाषणात निष्ठा प्रशिक्षण हा केंद्र शासनाचा उपक्रम असून अध्यापनाचे नवीन शास्त्र व अध्ययन निष्पत्ती यावर आधारित आहे, तरी त्याचा सर्व शिक्षकांनी चांगला अभ्यास करून लाभ घ्यावा असे आवाहन केले. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली तसेच आपल्या शाळेचे वर्ग, परिसर, स्वच्छतागृह स्वच्छ राहील याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सूचित केले. यावेळी सर्व शिक्षकांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
Published on : 22-01-2020 13:47:03,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update