नेताजी सुभाषचंद्र बोस जयांतीनिमित्त महापालिका मुख्यालयात अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्पी थिएटर येथे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त श्री. महावीर पेंढारी, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.नितीन काळे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, प्रशासकीय अधिकारी श्री. महेंद्र सप्रे तसेच इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
Published on : 23-01-2020 13:56:36,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update