छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवरायांना मानवंदना
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या सन्माननीय उपस्थितीत पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सभागृह नेते श्री. रविंद्र इथापे, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर, नगरसेवक श्री. लिलाधार नाईक व श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, कार्यकारी अभियंता श्री. अरविंद शिंदे व श्री. अजय संखे आणि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नागरिक, त्यातही युवकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालिका अर्पण केल्यानंतर, तुतारीच्या निनादात ललकारी देत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी - जय शिवाजी ’चा एकमुखाने नामगजर करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार, उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, सभागृहनेते श्री.रविंद्र इथापे, ड प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम. उषा भोईर, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त श्री. सुरेंद्र पाटील, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. किरणराज यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, उपआयुक्त श्री. नितीन काळे, कार्यकारी अभियंता श्री. अजय संखे व श्री.सुनिल लाड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशव्दाराजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या अर्धपुतळ्यासही पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
Published on : 19-02-2020 06:39:48,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update