नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 37 ठिकाणी कोव्हीड 19 लसीकरण करण्यात येत असून 16 मार्चपासून कोव्हीशिल्ड लसीव्यतिरिक्त कोवॅक्सिन लसीचा समावेश झालेला आहे. स्वच्छता पाहणीच्या अनुषंगाने विविध विभागांना भेटी देत असताना महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी आज राबाडागांव नागरी आरोग्य केंद्र तसेच कातकरीपाडा, राबाडे नागरी आरोग्य केंद्र येथील कोव्हीड 19 लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण प्रक्रियेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही व केंद्रावर लसीकरणासाठी आलेला नागरिक त्याच्याकडे योग्य कागदपत्रे असतील तर लसीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी राबाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा तळेगावकर आणि कातकरीपाडा केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना बनसोडे यांना दिले.
याप्रसंगी आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या. यामध्ये,
l महानगरपालिकेच्या सर्व 22 लसीकरण स्थळांवर नागरिकांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्च्या उपलब्धता,
l आवश्यकतेनुसार मंडप व्यवस्था,
l सोशल डिस्टन्सींग व मास्क अशा कोरोना सुरक्षा नियमांचे पालन,
l हात धुणे / सॅनिटायझर व्यवस्था,
l सध्याचा वातावरणातील उष्मा लक्षात घेऊन त्याठिकाणी पंख्यांची व्यवस्था,
l पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,
l कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीकरणाच्या नोंदणीसाठी 2 स्वतंत्र बुथची व्यवस्था
याबाबतची खबरदारी घेण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले.
l महत्वाचे म्हणजे लसीकरणासाठी केंद्रावर आलेल्या व्यक्तीला 30 मिनिटापेक्षा अधिक काळ केंद्रावर थांबावे लागू नये असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले.
शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 16 जानेवारी पासून लसीकरणास सुरुवात झालेली असून सद्यस्थितीत 18 मार्च 2021 पर्यंत 37 लसीकरण केंद्रांवर 59,494 नागरिकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.
तपशील
|
पहिला डोस
|
दुसरा डोस
|
पहिला टप्पा -
डॉक्टर्स व इतर आरोग्यकर्मी
|
18542
|
10464
|
दुसरा टप्पा -
पोलीस, सुरक्षा. स्वच्छता व इतर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे
|
11144
|
2645
|
तिसरा टप्पा -
ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील कोमॉर्बीड व्यक्ती
|
29808
|
-
|
एकूण
|
59494
|
-
|
नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथील 3 रूग्णालये, तुर्भे येथील माता बाल रूग्णालय तसेच 18 नागरी आरोग्य केंद्रे अशा 22 ठिकाणी कोव्हीड 19 लसीकरण केंद्रे सुरू असून तेथे विनामूल्य लसीकरण करण्यात येत आहे.
यामध्ये नागरिकांना आपल्या सोयीच्या वेळी लस घेता यावी याकरिता महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 तास लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच माता बाल रूग्णालय तुर्भे याठिकाणी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 18 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार, बुधवार, गुरूवार व शुक्रवार असे आठवड्याचे 4 दिवस सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 15 खाजगी रूग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात येत असून तेथे प्रति डोस रू. 250/- इतक्या शासनमान्य दराने लसीकरण केले जात आहे.
आजपर्यंत कोव्हीड लस घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीस मोठ्या प्रमाणात त्रास झालेला नसून लस पूर्णत: सुरक्षित आहे याची नोंद घेऊन नागरिकांनी लसीकरणासाठी आपला क्रमांक येईल तेव्हा अवश्य लस घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.