*रिलायन्स इंडस्ट्रिजच्या सीएसआर मधून नवी मुंबई महानगरपालिकेला 10 व्हेंटिलेटर्स *
*कोव्हीड विरोधातील लढाईमध्ये सामाजिक बांधलकी जपणा-या विविध घटकांनी मदतीचा हात पुढे करीत सहकार्याची भूमिका जपलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आरोग्य सुविधांची परिपूर्ती केली जात असताना त्यामध्ये कोव्हीडच्या सुरूवातीपासूनच अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योगसमुह यांचे मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.
सध्या कोव्हीडच्या संभाव्य तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली जात असताना त्यामध्येही विविध संस्था, उद्योगसमुह यांनी सहकार्याचा हात पुढे केलेला आहे.
अशाच प्रकारे रिलायन्स इन्डस्ट्रिज लि. यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) दहा अद्ययावत व्हेंटिलेटर्स नवी मुंबई महानगरपालिकेस प्रदान करण्यात आलेले आहेत. महापालिका मुख्यालयात हे व्हेटिंलेटर्स प्रादन करताना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयु्कत श्रीम. सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार तसेच रिलायन्स इंडस्ट्रिजचे सहा. उपाध्यश्र श्री.ए.व्ही.बेटकेकर, महाव्यवस्थापक श्री. शरद ओगले, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. अरविंद जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वीही मे.लालन कापडिया इंड. यांचेकडून 3 व्हेंटिलेटर्स, मे.हिदुस्थान प्लॅटिनम यांचेकडून 2 व्हेंटिलेटर्स तसेच मे.नोसील लिमी., मे.ग्रीन स्पेस लिमी., मे.कान्सबर्ग इं.लि. आणि मे.कुकरेजा लिमी. यांचेकडून प्रत्येकी 1 व्हेटिलेटर नवी मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झालेला आहे. विविध उद्योगसमुहांकडून अशाप्रकारे वैद्यकीय उपकरणांचे सहकार्य लाभल्याने महानगरपालिकेच्या कोव्हीड विरोधी लढ्याला सामाजिक उत्तरदायित्वाचे बळ लाभले आहे.
Published on : 15-08-2021 09:57:55,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update