माहे मे महिन्याचा महापालिका लोकशाही दिन संपन्न
महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मे महिन्याच्या लोकशाही दिनात आरोग्य विभागाशी संबंधीत 2 निवेदने प्राप्त झालेली होती. त्यापैकी अर्जदार व्यक्तीश: उपस्थित असलेल्या एका निवेदनाबाबत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी अर्जदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संयुक्त चर्चा करुन पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.
माहे जून महिन्याचा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी दि.06 जून 2022 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि.20 मे 2022 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्ज' असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचे आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जादाराने संबंधित विषयाबाबात याआधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. यामध्ये - न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल, सेवाविषयक - आस्थापनाविषयक बाबी याबाबातचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी. त्याचप्रमाणे विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. त्याशिवाय तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्ले गावठांण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ Website (www.nmmc.gov.in) यावरील फॉर्मस/अर्ज सेक्शनमधून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 02-05-2022 09:16:44,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update