वाशी विभागात नमुंमपा अतिक्रमण विभागाची धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाशी विभागअंतर्गत केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत उद्यानाकरीता आरक्षित असलेल्या मोकळ्या भूखंडावर तसेच वाशीगांव खाडी किनारी उभारण्यात आलेल्या झोपड्यांवर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून एकूण 334 अनधिकृत झोपड्या निष्कासित करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 11 मजूर, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने या झोपड्या निष्कासित करण्यात आले.
त्याचप्रमाणे वाशी विभाग अंतर्गत घर क्र. 767 व 765 भुखंड क्र. 201 च्या जवळील वाशीगांव येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले होते. या अनाधिकृत बांधकामास वाशी विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.
या अनधिकृत बांधकामावर वाशी विभाग कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करून करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 11 मजूर, 2 गॅस कटर, 3 हॅमर, ४ घन /हातोडे यांच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली.
तसेच वाशी विभागातील रघुलिला मॉल जवळील तसेच उत्तराखंड भवन लगत असलेल्या सब स्टेशन जवळील हाय टेंन्शन खाली मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले चायनिज वाशी विभाग कार्यालयामार्फत उचलण्यात आल्या. मोहिमेसाठी वाशी विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, 11 मजूर, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 26-05-2022 15:10:09,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update