*तात्पुरत्या कर्मचा-यांनाही किरकोळ रजा देण्याचा आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांचा महत्वपूर्ण निर्णय*
नवी मुंबई महानगरपालिका कामकाज सुरळीत रितीने सुरु रहावे व नागरिकांना विहित वेळेत चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने आवश्यक कर्मचा-यांची निकड लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 53 (1) आणि 53 (3) नुसार करार पध्दतीने (कंत्राट) तात्पुरत्या स्वरुपात जास्तीत जास्त 6 महिने (180) दिवस कालावधीकरिता अधिकारी / कर्मचारी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांमध्ये ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
*या करार पद्धतीने (कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच ठेकेदाराकडील कंत्राटी कामगार यांना किरकोळ रजा लागू करण्याबाबत होत असलेल्या मागणीचा साकल्याने विचार करून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग यांचेकडील दि. 07 सप्टेंबर 2017 रोजीच्या राजपत्र असाधारण भाग 8 यामधील CHAPTER IV 18 (1 व 2) च्या तरतूदीनुसार करारपध्दतीने (कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना सहा महिन्यांच्या कालावधीत 4 किरकोळ रजा तसेच ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांना दिनदर्शिका वर्षात (कॅलेंडर इयर) 8 किरकोळ रजा लागू करणेबाबत विशेष परिपत्रक निर्गमित केलेले आहे.*
करार पद्धतीने (कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी किरकोळ रजेची मुदत फक्त सहा महिन्यांच्या कालावधीकरिता तसेच ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांसाठी दिनदर्शिका वर्ष (कॅलेंडर इयर) पर्यंत वैध राहतील व त्यानंतर अवैध होतील असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी करार पद्धतीने (कंत्राट) निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच ठेकेदाराकडील कर्मचारी यांच्या कामाचा विचार करून किरकोळ रजा मंजूर केल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
Published on : 27-05-2022 11:59:54,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update