बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई
![WhatsApp Image 2022-11-02 at 5_22_11 PM.jpeg WhatsApp Image 2022-11-02 at 5_22_11 PM.jpeg](https://www.nmmc.gov.in/navimumbai/assets/251/2022/11/mediafiles/WhatsApp_Image_2022-11-02_at_5_22_11_PM.jpeg)
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालयांतर्गत शहाबाजगांव बेलापूर नवी मुंबई येथे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले होते. सदरच्या बांधकामासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे काम केले होते.
सदर अनधिकृत बांधकामास अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविने आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम हटविले नाही.
सदर अनधिकृत बांधकामावर अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी अे विभाग कार्यालय बेलापूर मधील अधिकारी / कर्मचारी, 11 मजूर, 01 गॅसकटर, 01 इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस तैनात होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
Published on : 02-11-2022 14:07:50,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update