नेरुळ विभागातील अनधिकृत झोपड्यांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रातील भूखंड क्र. जी-1/7 व भूखंड क्रमांक 7/7, सेक्टर 22, नेरूळ, नवी मुंबई हा नवी मुंबई महानगरपालिकेने सिडको प्राधिकरणाकडून हस्तांतरीत करून त्याठिकाणी उद्यान विकसीत करणेकरीता आरक्षित केलेले आहे.
तथापी सदर भूखंडावर एकूण 185 पेक्षा जास्त झोपड्यांचे अतिक्रमण झालेले होते. त्यामुळे उप आयुक्त (अतिक्रमण) नवी मुंबई महानगरपालिका यांचे निर्देशानुसार सदर भूखंडावरील संपूर्ण झोपडपट्टी, 03 पक्की घरे नमुंमपा अतिक्रमण विभागाकडून 1 पोकलन मशिन, 2 जेसीबी मशिन व 2 डंपरच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आली.
या झोपडपट्टी निर्मूलन मोहिमेवेळी नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, नेरूळ, तुर्भे, घणसोली, ऐरोली विभागाकडील कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण), अधिक्षक व अतिक्रमण विभागातील कर्मचारी, अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तसेच स्थानिक पोलीस स्टेशन नेरूळ येथील पोलिस निरीक्षक व पोलीस हजर होते.
Published on : 01-03-2023 13:58:32,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update