नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत एनआरपी कार्यशाळा संपन्न
नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथे 3 सप्टेंबर 2019 पासून नवजात अतिदक्षता विभाग सुरु झाला असून येथे 17 बेड्स अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध आहेत. या विभागाची कामगिरी अत्युत्तम असून गतवर्षी या रुग्णालयास लक्ष्य (LaQshya – (Labour Room Quality Improvement Initiative) मानांकन – प्लॅटिनम दर्जा प्राप्त झालेला आहे. असे मानांकन प्राप्त करणारे हे नवी मुंबई महानगरपालिकेचे पहिलेच रुग्णालय आहे.
या लक्ष्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विशेष कार्यशाळा घेणे आवश्यक असल्याने या रुग्णालयात दोन दिवस Basic Neonatal Resuscitation Program First Golden Minute Project या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या 2 दिवसीय कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी 32 प्रशिक्षणार्थी व दुसऱ्या दिवशी 30 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये डॉक्टर व परिचारिका यांना प्रशिक्षण देण्यात आले. ज्यामध्ये नवजात शिशूंचा Birth Asphyxia मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
आपल्या देशामध्ये Birth Asphyxia मुळे मृत्यूचे प्रमाण हे 20% पेक्षा अधिक असून नवजात शिशूंना पहिल्या एका मिनटात Basic NRP प्रशिक्षक डॉक्टर व परिचारिका यांचा उपचार मिळाल्यास हे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यादृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्वाची होती.
जन्माला येणाऱ्या 100 नवजात पैकी 10 बालकांना Resuscitation ची गरज लागते. या कार्यशाळेमुळे एकूण 62 प्रशिक्षणार्थी या प्रकारचे Resuscitation करण्यासाठी तयार झाले आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. अमोल देशमुख व डॉ. सचिन बिरादार यांनी केले होते. यावेळी डॉ. अभिजित म्हापणकर, डॉ. ओमप्रकाश जमादार, डॉ. शीतल कोल्हे व श्रीम. रत्ना देवरे तसेच श्रीम. अनिता हांडे, श्रीम. ज्योती पाईकराव व श्रीमती. नेश्वरी फर्नांडो दिनांक 06 ऑगस्ट 2023 रोजी प्रशिक्षक म्हणून लाभले. या कार्यशाळेमुळे राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील Birth Asphyxia चे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल असा विश्वास वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांनी व्यक्त केला.
Published on : 24-08-2023 13:38:37,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update