*45 वर्षावरील सर्व नागरिकांच्या कोव्हीड 19 लसीकरणाव्दारे लसीकरण प्रक्रियेला वेग*
पहिल्या टप्प्यात आरोग्यकर्मी, दुस-या टप्प्यात पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच तिस-या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती यांच्यानंतर आजपासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांच्या कोव्हीड लसीकरणाला सुरूवात करण्यात आलेली असून आज सर्वच लसीकरण केंद्रांवर चांगला प्रतिसाद मिळाला.
सध्या महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या 3 रूग्णालयांमध्ये अहोरात्र 24 x 7 लसीकरण होत असून तुर्भे माता बाल रूग्णालय व 19 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. याशिवाय सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रूग्णालयामध्ये जम्बो कोव्हीड लसीकरण केंद्रात सकाळी 8 ते रात्री 8 अशा दोन शिफ्टमध्ये 4 बूथ कार्यान्वित आहेत. महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण करण्यात येत आहे. याशिवाय 16 खाजगी रूग्णालयांमध्येही शासनमान्य रू. 250/- प्रतिडोस दराने लसीकरण केले जात आहे.
दि. 31 मार्चपर्यंत 93369 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आलेले असून आजपासून 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू झालेले असल्याने लसीकरणाला वेग येणार आहे.
Published on : 01-04-2021 16:23:53,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update