16 जानेवारी पासून महिलांकरीता कर्करोग निदान शिबिरांचे विविध प्रभागांमध्ये आयोजन
कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने आरोग्य विभागाच्या सहयोगातून महापालिका क्षेत्रातील महिलांकरीता प्रभाग निहाय कर्करोग निदान शिबिरांचे 16 जानेवारी पासून आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियमित वाढीमुळे उद्भवणारा रोग असून तो शरिराच्या कोणत्याही पेशीमध्ये व अवयवामध्ये होऊ शकतो हे लक्षात घेऊन व महिलांमध्ये याचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन 111 प्रभागांमध्ये प्रत्येक शिबिरात 100 महिलंची तपासणी करण्यात येत आहे. यात महिलांमध्ये आढळलेल्या लक्षणांनुसार तपासणी करण्यात येत आहे.
मुख कर्करोगाच्या लक्षणात - दोन आठवडयांपेक्षा जास्त काळही न बरा होणारा व्रण / चांदा / जखम, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडात लालसर पांढरा चट्टा. जेवण्यास / चावण्यास गिळण्यास त्रास होणे, जीभ हलविण्यास, बोलण्यास त्रास होणे, सतत तोंडाचा खराब वास येणे, तोंडात आकाराने वाढत जाणारी गाठ, जबडयात /जीभेत/ गालांत तीव्र वेदना, जीभेवर व ओठांवर बधिरपणा, आवाजात बदल होणे ही लक्षणे असतात.
गर्भाशय तोंडाचा कर्करोगाच्या लक्षणात - योनी मार्गातून मासिक पाळी बाह्य अनियमित रक्तस्त्राव होणे, रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्त्राव किंवा योनीमधून येणारा दुर्गंधीयुक्त रक्तमिश्रीत स्त्राव, शारीरिक संबंधाच्या वेळी किंवा नंतर होणारा रक्तस्त्राव अशी लक्षणे दिसून येतात.
स्तन कर्करोगाच्या लक्षणात - स्तनामध्ये किंवा काखेत गाठ येणे, सूज येणे, स्तनाच्या त्वचेवर डाग किंवा खड्डा पडणे, स्तनाग्र आत ओढले जाणे, स्तनात दुखणे, स्तनामधून पाणी किंवा रक्त वाहणे ही लक्षणे आढळतात.
अशाप्रकारे लक्षणे आढळलेल्या महिलांची या 31 मार्च पर्यंत चालणा-या शिबिरांमध्ये सकाळी 10 ते सायं 4.00 या वेळेत तपासणी करण्यात येणार आहे.
यापुढील काळात 05 फेब्रुवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र, पावणे (प्र.क्र.48), गुलमोहर सोसायटी सेक्टर 9 वाशी (प्र.क्र.60), हनुमान नगर बालवाडी तुर्भे (प्र.क्र. 71) याठिकाणी शिबिर संपन्न होत आहे.
06 फेब्रुवारी रोजी समाज मंदिर रमाबाई नगर बेलापूर (प्र.क्र.103), डॉ. डुपके क्लिनिक सेक्टर 19 नेरुळ (प्र.क्र.91), गावदेवी समाज मंदिर जुईपाडागांव /नमुंमपा शाळा क्र.17 (प्र.क्र.83) येथे शिबिरे होणार आहेत.
07 फेब्रुवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र इंदिरा नगर तुर्भे (प्र.क्र.69), नमुंमपा शाळा वाशी गांव (प्र.क्र.65), हनुमान मंदिर अंगणवाडी शिरवणे (प्र.क्र.89) येथे शिबिर संपन्न होत आहे.
11 फेब्रुवारी रोजी डॉ. निर्मला पाटील क्लिनिक/नमुंमपा शाळा, कोपरीगांव (प्र.क्र.56), साई प्रेरणा सोसायटी सेक्टर 4 घणसोली (प्र.क्र.33) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
12 फेब्रुवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र वाशी (प्र.क्र.63), गार्डन ऑफिस सेक्टर 1 कोपरखैरणे (प्र.क्र.37) व अंगणवाडी पंचपरमेश्वर मंदिर नेरुळ (प्र.क्र.94) येथे शिबिरे होणार आहेत.
13 फेब्रुवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र इंदिरानगर तुर्भे (प्र.क्र.73) व आदर्श अपार्टमेंट सोसायटी सेक्टर 2 जुईनगर (प्र.क्र.84) येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
14 फेब्रुवारी रोजी अजिंक्यतारा सोसायटी सेक्टर 10 कोपरखैरणे (प्र.क्र.49) आणि जुहूगांव अंगणवाडी (प्र.क्र.53) येथे निदान शिबिर होत आहे.
15 फेब्रुवारी रोजी बालाजी गार्डन सेक्टर 1 कोपरखैरणे (प्र.क्र.55) याठिकाणी शिबिर होणार आहे.
17 फेब्रुवारी रोजी नागरी आरोग्य केंद्र कातकरी पाडा (प्र.क्र.20) याठिकाणी शिबिर होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात येणा-या या महिलांकरिता विशेष कर्करोग निदान शिबिरांचा लाभ या प्रकारची लक्षणे आढळणा-या महिलांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 06-02-2020 11:03:16,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update