CBSE शाळा क्र. 94, कोपरखैरणे मधील नर्सरी वर्गातील प्रवेश प्रकिया सन 2020-21 साठी प्रवेशाची अंतरिम निवड यादी.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा क्र. 94, कोपरखैरणे, सेक्टर-11 येथील सी.बी.एस.ई. बोर्डाच्या शाळेसाठी सन 2020-21 च्या नर्सरी प्रवेशाकरीता 60 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्रवेशासाठी एकूण 413 अर्ज प्राप्त झाले होते. पडताळणी अंती 166 अर्ज पात्र ठरले होते. नर्सरी प्रवेशाकरीता एकूण 60 जागा असल्यामुळे दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी प्रवेशाची सोडत शिक्षण विभागात काढण्यात आली आहे.
कोव्हीड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोडतीसाठी शिक्षणाधिकारी तथा उपआयुक्त, प्र. विस्तार अधिकारी, केंद्र समन्वयक, विषयतज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार उपस्थित होते. सदर सोडत लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आली. या सोडतीनुसार प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधिन राहून अंतरिम निवड यादी व प्रतिक्षा यादीसह शाळेच्या सूचना फलकावर व नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
या सोडत प्रक्रियेची संपूर्ण व्हिडीओ शुटींग करण्यात आली असून ती देखील नमुंमपाच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Published on : 21-08-2020 15:57:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update