चित्रांतून स्वच्छतेचा संदेश साकारण्यासाठी 4 जानेवारीला चित्रकला स्पर्धा
‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ मध्ये देशातील स्वच्छ शहरांमध्ये असलेले नवी मुंबईचे सातवे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांच्या सहयोगाने सज्ज असून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विदयार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मनातील स्वच्छतेविषयीची जाणीव चित्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक 04 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 8.00 ते 10.00 वा. या वेळेत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020 - चित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा (1) वंडर्स पार्क, से.19 ए, नेरुळ (2) स्व. मीनाताई ठाकरे उदयान, से.17, वाशी (3) निसर्ग उदयान, से.14, कोपरखैरणे आणि (4) झेन गार्डन, चिंचोली उद्यान, सेक्टर 5, ऐरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्व सहभागी विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
या स्पर्धेकरिता इयत्ता 5 वी ते 7 वी हा पहिला गट तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी असा दुसरा गट असे दोन गट करण्यात आले असून गटनिहाय विषय देण्यात आले आहेत यामध्ये,
गट पहिला – (1) माझी शाळा - सुंदर शाळा
|
(2) माझा परिसर -स्वच्छ परिसर
|
(3) स्वच्छ शहर – हरित शहर
|
गट दुसरा – (1) माझा कचरा माझी जबाबदारी
|
(2) स्वच्छ भारत अभियान माझा सहभाग.
|
(3) कच-याचे वर्गीकरण व पुनर्वापर - असे स्पर्धा विषय आहेत.
|
या स्पर्धेच्या पुरस्काराचे स्वरुप प्रत्येक गटामध्ये गुणानुक्रमे प्रत्येकी पहिल्या 5 क्रमांकांना अनुक्रमे रु.11 हजार, 9 हजार, 7 हजार, 5 हजार व 3 हजार याप्रमाणे पारितोषिके दिली जाणार असून 5 चित्रकृतींना उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.1 हजार रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कार व स्मृतीचिन्हांचे वितरण समारंभपूर्वक केले जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणा-या विद्यार्थ्यांनी क्रेयॉन्स, जलरंग, पॅड, ब्रश आदी आवश्यक साहित्य सोबत आणावयाचे आहे. स्पर्धेच्या ठिकाणी किमान 15 मिनीटे आधी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावयाचे असून या चित्रकला स्पर्धेमध्ये विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे व शहर स्वच्छतेविषयीच्या आपल्या अभिनव संकल्पनांना चित्ररूप द्यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
Published on : 03-01-2020 10:46:18,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update