नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग नवी मुंबई युनायटेड रनमध्ये रविवारी राज्यातील धावपटू धावणार
नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्टर्लिंग इन्स्टिटयुट नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने “एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी” हा संदेश देत "नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग नवी मुंबई युनायटेड रन (NAVI MUMBAI MAYOR MARATHON In Association With STERLING NAVI MUMBAI UNITED RUN” Orgnized by SMART CONCEPTZ)" चे आयोजन करण्यात आले आहे. सदj मॅरेथॉन रविवार दि. 05 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 5.30 ते 8.30 या वेळेत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरुन पामबीच रोडवर आयोजित करण्यात आली आहे.
ही मॅरेथॉन स्पर्धा राज्यस्तरावरील हाफ मॅरेथॉन 21 कि.मी., 10 कि.मी., 5 कि.मी. फन रन अशा विविध गटांत होत असून यामध्ये राज्यातून विविध जिल्हयातील अनेक नामांकीत धावपटू सहभागी होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना पुढील मुंबई येथील मॅरेथॉनमध्ये क्वालिफायर होण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नवी मुंबई महापौर मॅरेथॉनला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. ऑनलाईन पध्दतीने सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना टी शर्ट व सुसंगत सर्व कीट तसेच सहभाग प्रमाणपत्र आणि मेडल प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर यामध्ये नवी मुंबईमधील शालेय 17 वर्षाआतील मुला - मुलींकरीता स्वतंत्र 3 कि.मी. व 14 वर्षाआतील मुला - मुलींकरीता स्वतंत्र 2 कि.मी. रनचे आयोजन करण्यात येत असून यात सहभागी सर्वांना टी शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. मॅरेथॉनमधील विजेत्या स्पर्धकांना एकुण रु. 3.84 लक्ष इतक्या रक्कमेची रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या “एक पाऊल नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी” हा संदेश देत धावणा-या “नवी मुंबई महापौर मॅरेथॉन व स्टर्लिंग नवी मुंबई युनायटेड रन” स्पर्धेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शहर स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही मॅरेथॉन मोठ्या प्रमाणावर स्वच्छता संदेश प्रसाराचे काम करणार आहे. त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांबरोबर नागरिकांनी सुध्दा सहभागी व्हावे असे महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Published on : 03-01-2020 16:15:10,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update