स्वयंसेवी संस्थांच्या कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरजू, गरीब, मुली, मागासवर्गीय घटक, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार अशा घटकांकरीता विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना, लोकपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. या योजनांची, उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचावी तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध सामाजिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थाचा या कार्यात सहभाग असावा यादृष्टीने महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित विशेष कार्यशाळेला व्यापक प्रतिसाद मिळाला.
समाज विकास विभाग यांच्या वतीने राबविण्यात येणा-या लोककल्याणकारी योजना प्रत्येक लाभार्थी घटकापर्यंत पोहचाव्यात व गरजू लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता यावा याकरिता अत्यंत महत्वाची असलेली ही कार्यशाळा 80 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिका-यांनी सहभागी होत यशस्वी केली. यामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील, उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित कऱण्यात आलेल्या या स्वयंसेवी संस्था नेटवर्कींग कार्यशाळेला फाऊंडेशनचे प्रमुख श्री. सचिन चांदोरकर यांनी संबोधित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व समाज घटकांना उपयोगी ठरतील अशा जनहिताय योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून त्याचा लाभ जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहचावा यासाठी आयोजित या कार्यशाळेला स्वयंसेवी संस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
Published on : 17-01-2020 15:26:26,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update