महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते मुख्यालयात ॲम्फीथिएटर येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौरांसमवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, नगरसेविका श्रीम. अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त शहर श्री. महावीर पेंढारी, शहर अभियंता श्री. सुरेंद्र पाटील, मुख्य लेखा परीक्षक श्री. दयानंद निमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त श्रीम. क्रांती पाटील, कार्यकारी अभियंता श्री. सुनिल लाड तसेच इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.
आजच्या हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत सकाळी 11.00 वा. ते 11.02 पर्यंत दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळण्यात आली.
Published on : 30-01-2020 12:28:57,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update