बेलापूर गांवातील बहुउद्देशीय इमारतीतून नागरिकांना उत्तम सुविधा

नवी मुंबई शहर वसण्यापूर्वीपासून बेलापूर हे अत्यंत महत्वाचे गाव असून येथील नागरिकांच्या विविध कार्यक्रमासाठी एक चांगली वास्तू उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी बेलापूर गावात उत्सवामध्ये आयोजित केली जाणारी कुस्तीची परंपरा जपण्यासाठी यापुढील काळात ठोस प्रयत्न केले जातील असे सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. 106, बेलापूर गांव येथे उभऱण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत उप महापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, स्थानिक नगरसेविका श्रीम. पुनम पाटील, माजी नगरसेवक श्री. अमित पाटील आणि इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बहुउद्देशीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर महानगरपालिकेच्या वतीने ग्रंथालय सुरु होत असून त्याचाही शुभारंभ महापौर श्री. जयवंत सुतार यांनी केला. सदर इमारतीस श्री राम मारुती सभागृह तसेच बेलापूर गांव येथील मासळी मार्केटला कै. सुभद्रा शिमग्या पाटील मासळी मार्केट अशा नामफलकाचे नुतनीकरण याप्रसंगी संपन्न झाले.
स्थानिक नगरसेविका श्रीम. पुनम पाटील यांनी आपल्या कार्यकाळात उपलब्ध करून दिलेल्या विविध नागरी सुविधांची उपस्थितांना माहिती देत या बहुउद्देशीय इमारतीत ग्रंधालयाप्रमाणे व्यायमशाळा सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचे सागंत नागरिकांच्या वतीने आनंद व्यका केला.
Published on : 03-03-2020 12:52:33,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update