कलावंतांना प्रेरणा देणारी नवी मुंबई महानगरपालिका - सुप्रसिध्द अभिनेत्री हेमांगी कवी

अगदी सुरुवातीपासूनच मुळच्या ठाणे बेलापूर पट्टीत नाट्य, गायन व भजनी परंपरा मोठ्या प्रमाणावर जोपासली जात असून बदलत्या काळानुसार त्यामध्ये विकासात्मक परिवर्तन झाले. या कलात्मक विकासाला वाव देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका विविध स्पर्धांचे आयोजन करीत असून नृत्य व गायन स्पर्धा हा त्याचाच एक भाग असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी नवी मुंबईतून शहराचा नावलौकीक वाढविणारे कलाकार निर्माण होतील असे विश्वासपूर्ण मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्यांनी कलावंतांचे कौतुक केले.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. हेमांगी कवी, गायन स्पर्धेचे परिक्षक सुप्रसिध्द संगीतकार चिनार, महेश, नृत्य स्पर्धेचे परिक्षक नामावंत अभिनेते नृत्यकलावंत श्री. नकुल घाणेकर व श्रीम. सुकन्या काळण, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव व श्रीम. अभिलाषा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई हे सर्वांना भूरळ घालणारे सुंदर शहर असून महानगरपालिकेने पुढाकार घेऊन कलावंतांना प्रेरणा देण्याचे काम करावे ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट असल्याचे सांगत सुप्रसिध्द अभिनेत्री श्रीम. हेमांगी कवी यांनी कलावंतांनी सतत शिकत राहिले पाहिजे अशा शब्दात मार्गदर्शन केले.
गायन स्पर्धेचे परिक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना नामांकित संगीतकार महेश ओगले यांनी प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळी आपण जे काही सादर करतो त्यावर पारितोषिक अवलंबून असते, मात्र पारितोषिक मिळाले नाही म्हणून निराश न होता आपल्या त्यावेळेच्या सादरीकरणातील उणीवांचा अभ्यास करून पुढच्या वेळी आपल्या सादरीकरणाचा स्तर उंचवावा अशा शब्दात स्पर्धकांचे मनोबल उंचावले.
नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना लोकप्रिय नृत्य कलावंत व अभिनेते श्री. नकुल घाणेकर यांनी कलेमुळे माणुसकी जिवंत राहते असे सांगत आजच्या अंतिम फेरीतील स्पर्धक कलावंतांच्या सादरीकरणात सांस्कृतिकपणा होता तसेच उत्तम ऊर्जा व उत्स्फुर्तता होती असे निरीक्षण व्यक्त केले. नृत्य करताना त्यामधील आशय समजून घेतला तर नृत्यातील हालचाली अर्थवाही होतील असेही मत त्यांनी नोंदविले.
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी आपल्या मनोगतात सादरीकरण करणा-या अनेक स्पर्धक कलावंतांची उदाहरणे देत नवी मुंबई मध्ये इतके नैपुण्यपूर्ण कलावंत आहेत याचा आनंद होतो असे सांगितले व या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे त्यांचे अंगभूत कलागुण रसिकांसमोर सादर करता आले याबद्दल समाधान व्यक्त केले.
नवी मुंबई महापौर चषक गायन स्पर्धेतील वैयक्तिक गायन प्रकारामध्ये खुल्या गटात अक्षय नायर तसेच लहान गटात समृध्दी जाधव यांनी महापौर चषक पटकाविला. समुह गायन प्रकारामध्ये खुल्या गटात संदेश कनिष्ठ महाविद्यालय यांनी तसेच लहान गटात संदेश विद्यालय यांनी महापौर चषक संपादन केला.
नवी मुंबई महापौर चषक नृत्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक नृत्य प्रकारात खुल्या गटात निकिता सोलंकी व लहान गटात आर्या मोरे हे महापौर चषकाचे विजेते ठरले. त्याचप्रमाणे समुह नृत्य प्रकारात खुल्या गटात एन.डी.ए. नृत्य समुह व लहान गटात सिध्दीविनायक नृत्य कलामंदिर हे महापौर चषकाचे मानकरी झाले.
गायन स्पर्धेत 104 व नृत्य स्पर्धेत 127 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामधून प्राथमिक फेरीत श्रीम. रुपाली मोघे (गायन) व श्री. सचिन पाटील (नृत्य) यांनी अंतिम फेरीसाठी गायक व नृत्य कलावंतांची निवड केली. त्यांची महाअंतिम फेरी होऊन प्रत्येक गटात प्रथम चार क्रमांक व एक उत्तेजनार्थ अशी पाच पारितोषिके ऱोख ऱक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली. (सोबत सविस्तर निकाल जोडला आहे)
त्याचप्रमाणे प्राथमिक फेरीतील उत्तम सादरीकरण करणा-या मात्र अंतिम फेरीत निवड न झालेल्या गुणवंत गायक व नृत्य कलावंतांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपर पारितोषिके प्रदान करण्यात आली. महाअंतिम सोहळ्याचे औचित्य साधून स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठानच्या दिव्यांग कलावंतांनी सादर केलेल्या नृत्य कलाविष्काराला रसिकांनी उभे राहून टाळ्यांची दाद दिली. नवी मुंबई हायस्कुलच्या ज्युनियर के.जी. चे विद्यार्थी तसेच नमुंमपा शाळा क्र. 91 चे विद्यार्थी यांनीही सादर केलेल्या नृत्याला कौतुकाची दाद मिळाली.
नवी मुंबईतील चित्रपट दिग्दर्शक अ. कादिर यांच्या आगामी अजिंक्य चित्रपटाचे पोस्टर व टिझर यावेळी प्रदर्शित करण्यात आला. नवी मुंबईतील उदयोन्मुख गायक व नृत्य कलावंतांचा कलाविष्कार पाहण्यासाठी रसिकांनी विष्णुदास भावे नाट्यगृहात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
नवी मुंबई महापौर चषक नृत्य व गायन स्पर्धा 2019-20 निकाल
स्पर्धा
|
पारितोषिक
|
गायन स्पर्धा
|
नृत्य स्पर्धा
|
वैयक्तिक लहान गट
|
प्रथम
|
समृध्दी जाधव
|
आर्या मोरे
|
व्दितीय
|
विशाल चव्हाण
|
समर्थ कदम
|
तृतीय
|
वेदांत साळवी
|
स्वरा इंदुलकर
|
चतुर्थ
|
ज्ञानेश्वरी घाडगे
|
आर्या म्हात्रे
|
उत्तेजनार्थ
|
अस्मी गोरे
|
आकृती घोश
|
वैयक्तिक खुला गट
|
प्रथम
|
अक्षय. नायर
|
निकीता सोलंकी
|
व्दितीय
|
विधी घोगळे
|
प्रदीप गुप्ता
|
तृतीय
|
तुषार गवारे
|
चैत्राली दळवी
|
चतुर्थ
|
अनिकेत घायतडळे
|
राहुल गोंड
|
उत्तेजनार्थ
|
मुग्धा इंदुरकर
|
पुर्वी मास्टर
|
समुह गायन लहान गट
|
प्रथम
|
संदेश विद्यालय
|
सिध्दीविनायक नृ्त्य कलामंदीर
|
व्दितीय
|
सनराईज इंग्लीश स्कुल
|
आयईएस नवी मुंबई हायस्कुल
|
तृतीय
|
नमुंमपा शाळा क्र. 119
|
सनराईज इंग्लिश स्कुल
|
चतुर्थ
|
नमुंमपा शाळा क्र. 41
|
रा.फ. नाईक विद्यालय
|
समुह गायन खुला गट
|
प्रथम
|
संदेश विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय
|
एन.डी.ए. ग्रुप
|
व्दितीय
|
एच.वाय.एम.एन. 006 ग्रुप
|
डांसींग दिवस
|
तृतीय
|
ओम साई भजन मंडळ
|
कलामंदिर डांस क्लास
|
चतुर्थ
|
द म्युझिकोरम बँड
|
यू.एफ.डी.सी. ग्रुप
|
Published on : 04-03-2020 12:20:39,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update