नवी मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 96 नुसार स्थायी समितीने सर्वंकष विचार करून तयार केलेला नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2019-2020 चा सुधारित आणि सन 2020-2021 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज “अ”, “क” आणि “पी” त्याचप्रमाणे परिवहन उपक्रमाचा सन 2019-20 चा सुधारित व सन 2020-21 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज “ब” तसेच वृक्षप्राधिकरणाचा सन 2019-20 चा सुधारित व सन 2020-21 चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज अंतिम स्विकृतीसाठी स्थायी समितीचे सभापती श्री. नविन गवते यांनी महानगरपालिका सर्वसाधारण सभेपुढे महापौर श्री. जयवंत सुतार यांच्याकडे सादर केला.
याप्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांच्या समवेत व्यासपीठावर उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त श्री. अण्णासाहेब मिसाळ, स्थायी समिती सभापती श्री. नविन गवते, सभागृह नेता श्री. रविंद्र इथापे, शिवसेना पक्षप्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय जनता पार्टी पक्षप्रतोद श्री. रामचंद्र घरत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष प्रतिनिधी नगरसेविका श्रीम. हेमांगी सोनावणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांनी सादर केलेला सन 2019-20 चा सुधारित अर्थसंकल्प अ, क आणि पी सूचित सुधारणांसह स्थायी समितीने स्विकृत केला असून आरंभीची शिल्लक रु.1905 कोटी 69 लक्ष 64 हजार जमेसह, एकूण रु.4325 कोटी 31 लक्ष 72 हजार इतकी सुधारित जमा (महसुली आणि भांडवली) आणि सुधारित खर्च (महसुली आणि भांडवली) एकूण रु.3107 कोटी, 54 लक्ष 85 हजार इतका अपेक्षित केला आहे.
त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त यांनी सादर केलेले सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक अ, क आणि पी सूचित सुधारणांसह स्थायी समितीने सुधारणेसह मंजूर केले आहे. आरंभीची शिल्लक रु.1217 कोटी 76 लक्ष 87 हजार जमेस धरून स्थायी समितीने सुचविलेल्या वाढीसह एकूण जमा (महसुली व भांडवली) रु.4150 कोटी आणि एकूण खर्च (महसुली, भांडवली, इतर) रु.4148 कोटी 91 लक्ष इतका अपेक्षित करण्यात आला आहे. तसेच वर्षाअखेर रु.1 कोटी 9 लक्ष इतकी रक्कम शिल्लक अंदाजित करण्यात आली आहे.
याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2019-20 चा सुधारित रु.4325.31 कोटी जमा व रु.3107.54 कोटी खर्च त्याचप्रमाणे सन 2020-21 चा मूळ रु.4150 कोटी जमा आणि रु.4148.91 कोटी खर्च व रु.1 कोटी 9 लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्पीय अंदाज सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात आलेला आहे.
(स्थायी समिती सभापती श्री. नविन गवते यांनी अर्थसंकल्पीय अंदाज सादर करताना केलेले निवेदन सोबत जोडलेले आहे.)
सन 2019-2020 चा सुधारित आणि सन 2020-2021 चा मूळ अर्थसंकल्प 'अ', 'क' आणि 'पी' यावरील सभापती- स्थायी समिती यांचे निवेदन
सन्मा. महापौर महोदय, सन्मा. उपमहापौर महोदया, सर्व सन्मा. सदस्य, सन्मा. आयुक्त, अधिकारी वर्ग आणि उपस्थित पत्रकार आणि नागरिक, नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2019-2020 चे सुधारित आणि सन 2020-2021 चे मूळ स्थायी समितीने मंजूर केलेले जमा-खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आपणांसमोर सादर करीत आहे.
मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी सन 2019-2020 चे सुधारित आणि सन 2020-2021 चे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. तसेच महानगरपालिकेच्या परिवहन विभाग आणि वृक्ष प्राधिकरण या विभागांचेही सन 2019-2020 चे सुधारित आणि सन 2020-2021 चे जमा-खर्चाचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मंजूरीसाठी सादर केले होते.
वरील नमूद चालू आर्थिक वर्षाच्या सुधारित आणि पुढील आर्थिक वर्षाच्या जमा-खर्चाच्या अंदाजपत्रकांवर विचारविनिमय करण्यासाठी स्थायी समितीच्या विशेष सभा दिनांक 25 व 26 फेब्रुवारी 2020 रोजी घेण्यात आल्या. जमा खर्चाबाबत स्थायी समितीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर दिनांक 26 फेब्रुवारी, 2020 रोजी स्थायी समितीने सुचविलेले बदल, सूचना आणि आढाव्याअंती निघालेल्या निष्कर्षासहित अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात आले आहेत.
सन 2019-2020 चे जमा व खर्चाचे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 'अ', 'क' आणि 'पी':-
मा. आयुक्त यांनी सन 2019-2020 चे सुधारित अंदाजपत्रक 'अ', 'क' आणि 'पी' स्वरुपात सादर करताना, महानगरालिकेची एकूण सुधारित जमा (महसूली व भांडवली) रुपये 4275 कोटी 31 लाख 72 हजार इतकी दर्शविलेली आहे.
मा. आयुक्त यांनी सन 2019-2020 चे सुधारित अंदाजपत्रक 'अ', 'क' आणि 'पी' स्वरुपात सादर करताना, ¨महानगरपालिकेचा सुधारित खर्च रुपये 3057 कोटी 54 लाख 85 हजार इतका दर्शविलेला आहे.
वास्तवाचे भान ठेवता महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झालेली असून, खर्च देखील वाढला आहे. तसेच गेल्या आणि चालू आर्थिक वर्षात तसेच पुढील आर्थिक वर्षात देखील महानगरपालिका शिलकी जमा-खर्चाचे अंदाजपत्रक प्रस्तावित करीत आहे. याचाच अर्थ सन 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षात वेळोवेळीच्या मंजूर अंदाजपत्रकात सुचविण्यात आलेली, प्रस्तावित केलेली कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र प्रत्यक्षात नागरी सुविधा कामांचा आढावा घेतल्यास काही कामे आजही पूर्ण झालेली नाहीत ती करणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब यांनी सन 2000 साली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईच्या तमाम जनतेला अभिवचन दिले होते की, आगामी 20 वर्षाच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही. त्या अभिवचनाची पूर्तताú झाली असून यावर्षीही कोणत्याही प्रकारची कर वाढ न करता चालू आर्थिक वर्षाचेच दर आगामी वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहेत, हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेला लाभलेली पूर्वेकडील डोंगररांगातील हिरवाई तसेच पश्चिमेकडील विस्तृत खाडीकिनारा यामुळे नव्या मुंबईचे पर्यावरण जपले जात आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे लाभलेली जलसंपन्नता, महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनेक तलाव, नैसर्गिक जलस्त्रोत, घनकचरा व्यवस्थापनाची शास्त्रोक्त प्रणाली, सांडपाणी शुध्द करणारी पर्यावरणपूरक अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रे, हिरवीगार मनोरंजनपर आकर्षक उद्याने, मैदाने, रोजगाराभिमुख आय.टी.हब, सुनियोजित प्रशस्त रस्ते, प्रवासीहिताय वाहतुक व्यवस्था, अत्याधुनिक शैक्षणिक संकुले, नागरिकांना एका क्लिकवर सोय पुरविणारी महानगरपालिकेची ई-गर्व्हनन्स प्रणाली अशा अनेक बाबींमुळे नवी मुंबई महानगरपालिका देशात सतत नावाजली गेलेली आहे. महानगरपालिकेने केलेल्या अनेक कामांची दखल भारत सरकार आणि राज्य शासनú यांनी वेळोवेळी घेत विविध पुरस्कारांद्वारे कौतुकाची थाप दिली आहे. विशेषत्वाने महानगरपालिकेने सर्वांच्या सहकार्याने राबविलेले स्वच्छ भारत अभियान आणि त्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत तसेच याकरीता मोठ्या प्रमाणावर केलेले सामाजिक प्रबोधन यामुळे नवी मुंबई महानगरपालिका परिसर पूर्वीपेक्षाही जास्त प्रमाणात स्वच्छ होऊन नावाजला गेला आहे. स्वच्छतेबाबत महानगरपालिकेने केलेले काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. ¨महानगरपालिकेचा हा नावलौकिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व जनता यांनी एकत्रितपणे केलेल्या कामाचे फलित आहे असे मी मानतो.
सन 2019-2020 चे सुधारित अंदाजपत्रक मा. स्थायी समितीने सुचविलेली जमेची वाढ(+)
(रु. लाखात)
अ.क्र
|
सेवा/कोड क्र.
|
जमा तपशील
|
मा.आयुक्तांचे जमेचे अंदाज
|
वाढ (+)
|
एकुण
|
1
|
RI/A.33/1112
|
परिवहन उपक्रमाकरीता शासन अनुदान
|
0.00
|
5000.00
|
5000.00
|
एकूण जमा वाढ (+)
|
|
5000.00
|
|
तपशिल
|
मा.आयुक्तांनी प्रस्तावित केलेले अंदाज
|
मा.स्थायी समितीने सुचविलेली वाढ(अ)
|
मा.स्थायी समितीचा
अर्थसंकल्पीय
अंदाज
|
आरंभीच्या शिल्लकेसह अंदाजपत्रकीय जमा
|
427531.72
|
5000.00
|
432531.72
|
सन 2019-2020 चे सुधारित अंदाजपत्रक मा. स्थायी समितीने सुचविलेली खर्चाची वाढ (+)
(रु. लाखात)
|
अ.क्र
|
बजेट कोड क्र.
|
खर्चाचा तपशील
|
मा.आयुक्तांचे खर्चाचे अंदाज
|
वाढ (+)
|
एकुण
|
1
|
CE/A.33/2167
|
परिवहन उपक्रमास अनुदान एन.एम.एम.टी. ग्रांट
|
10700.00
|
5000.00
|
15700.00
|
एकूण खर्च वाढ(+)
|
|
5000.00
|
|
(रु. लाखात)
तपशील
|
मा.आयुक्तांनी प्रस्तावित केलेले अंदाज
|
मा.स्थायी समितीने सुचविलेली वाढ (+)
|
मा.स्थायी समितीचा अर्थसंकल्पीय अंदाज
|
एकूण अंदाजपत्रकीय खर्च
|
305754.85
|
5000.00
|
310754.85
|
अखेरची शिल्लक
|
121776.87
|
--
|
121776.87
|
अखेरच्या शिल्लकेसह एकूण अंदाजपत्रकीय खर्च
|
427531.72
|
5000.00
|
432531.72
|
तसेच सन 2019-2020 च्या सुधारित अंदाजपत्रकात सुचविल्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत :-
महानगरपालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये मालमत्ता कर, वस्तु व सेवा कर अनुदान, नगररचना विभागामार्फत प्राप्त होणारे शुल्क,पाणी पट्टी तसेच जाहिरातीद्वारे मिळणारे उत्पन्न, विविध योजना राबविण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान या बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. महानगरपालिकेचा महसूल वाढविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणी, कार्यप्रणाली व प्रयत्न यांची उचित सांगड घालणे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे.
महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागामार्फत महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्यात येऊन त्याद्वारे नागरिकांना मुलभूत नागरी सेवा-सुविधा देणे, नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणे व त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देऊन नवी मुंबई महानगरपालिकेचा नावलौकीक वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
नवी मुंबई महानगरपालिकेला विविध क्षेत्रात पुरस्कार मिळण्यामागे अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या भरीव कामगिरीचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या कामांमुळेच ही सर्व उद्दिष्ट्ये आपण गाठू शकलो. नवी मुंबई महानगरपालिका कमीत-कमी कर्मचा-यांमध्ये या सर्व उपाययोजना करीत आहे याचे निश्चितच कौतुक आहे.
मा. आयुक्त, उप आयुक्त(मालमत्ता कर) व त्यांचे कर्मचारी यांनी मालमत्ता कराचे वसूलीबाबत जे अथक, आणि नाविन्यपूर्वक प्रयत्न केले आहेत, त्यामुळे सन 2018-19 च्या तुलनेत सन 2019-20 मधील प्रत्यक्ष कराची वसूली जास्त होत आहे. वसूलीसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, थकबाकीदाराचे विश्लेषण करुन करण्यात येत असलेला पाठपुरावा व त्यामुळे सन 2019-20 मध्ये झालेली वाढीव वसूली याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.
महानगरपालिकेस सूचित करण्यात येते की, महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र आणि फार मोठ्या प्रमाणावर असणा-या मालमत्ता व मालमत्ता करांची वसूली करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक अशा जास्तीत जास्त प्रमाणात अधिकारी-कर्मचारी यांची संख्या वाढविणे आणि त्यांना अत्यावश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे अत्यंत निकडीचे आहे.
वरील वस्तुस्थिती व सूचना यांचा विचार केला असता स्थायी समितीने सदर मालमत्ता कराच्या मूळ अंदाजपत्रकात रुपये 150 कोटीची वाढ सुचविली आहे. मालमत्ता करापोटी सन 2020-21 या आर्थिक वर्षात रुपये 780 कोटी उत्पन्न गृहीत धरले आहे.
महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भूखंडाच्या विकासासाठी तसेच अन्य संबंधित बाबींसाठी विविध प्रकारच्या परवानग्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मधील तरतुदी आणि मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार दिल्या जातात. याबाबत महानगरपालिका विविध शुल्क आकारते. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वाढती बांधकामे, भूखंडाचे विकास व त्यासाठी लागणा-या परवानग्या यांचा आढावा घेतल्यानंतर स्थायी समितीने नगररचना विकास शुल्काच्या जमेत सन 2020-21 साठी रुपये 100 कोटीची वाढ प्रस्तावित केली आहे. नगररचना विकास शुल्कापोटी एकूण उत्पन्न रुपये 225 कोटी गृहीत धरले आहेत.
केंद्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे दिनांक 1/07/2017 पासून वस्तु व सेवा कराची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. सन 2018-19 चे तुलनेत सन 2019-20 मध्ये स्थानिक संस्था कराची जास्त वसुली झाल्याचे दिसून येते. त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.
वस्तु व सेवा कराची अंमलबजावणी होण्यापूर्वी महानगरपालिका एलबीटीद्वारे आणि एलबीटीच्या अंमलबजावणी पुर्वी सेसद्वारे सर्व संबंधित व्यापा-यांकडून कर वसूली करीत होती. हे उत्पन्न देखील महानगरपालिकेच्या प्रमुख उत्पन्न स्त्रोतांपैकी एक होते. स्थायी समितीने स्थानिक संस्था कराच्या जमेत सन 2020-21 साठी रुपये 50 कोटीची वाढ प्रस्तावित केली आहे. स्थानिक संस्था करापोटी एकूण उत्पन्न रुपये 1300 कोटी गृहीत धरले आहे.
सन 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या जमा-खर्च अंदाजपत्रकाचा विचार करुन स्थायी समितीने खालील वाढ सूचित करुन मंजूर केली आहे:-
सन 2020-2021 चे मूळ अंदाजपत्रकात मा. स्थायी समितीने सूचविलेली
जमेची वाढ (+)
(रु. लाखात)
अ.क्र
|
सेवा/कोड क्र.
|
जमा तपशिल
|
मा.आयुक्तांचे जमेचे अंदाज
|
वाढ (+)
|
एकुण
|
1
|
एकत्रित
|
मालमत्ता कर Property Tax
|
63000.00
|
15000.00
|
78000.00
|
2
|
एकत्रित
|
नगर रचना Town Planning
|
12500.00
|
10000.00
|
22500.00
|
3
|
एकत्रित
|
स्थानिक संस्था कर
|
125000.00
|
5000.00
|
130000.00
|
एकूण जमा वाढ(+)
|
|
30000.00
|
|
तपशिल
|
मा.आयुक्तांनी प्रस्तावित केलेले अंदाज
|
मा.स्थायी समितीने सुचविलेली वाढ(अ)
|
मा.स्थायी समितीचा अंदाज
|
आरंभिच्या शिल्लकेसह अंदाजपत्रकीय जमा
|
385000.00
|
30000.00
|
415000.00
|
सन 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकीय जमाखर्चात खर्चाच्या तरतूदीमध्ये खालीलप्रमाणे वाढ सूचित करुन मंजूर केली आहे. या सर्व बाबींस स्थायी समितीने मंजूरी दिलेली आहे :-
सन 2020-2021 चे मूळ अंदाजपत्रकात मा.स्थायी समितीने सुचविलेली खर्चाची वाढ (+)
(रु. लाखात)
|
अ.क्र
|
बजेट कोड क्र.
|
खर्चाचा तपशिल
|
मा.आयुक्तांचे खर्चाचे अंदाज
|
वाढ (+)
|
एकुण
|
1
|
CE/A.33/2167
|
परिवहन उपक्रमास अनुदान एन.एम.एम.टी. ग्रांट
|
9500.00
|
4275.00
|
13775.00
|
2
|
CE/A.33/2168
|
परिवहन उपक्रम डेपोकरीता जमीन विकत घेणे व डेपो विकसित करणे व भांडवली कामे
|
0.00
|
7000.00
|
7000.00
|
3
|
CE/A.9/2019
|
उघड्या नाल्यांची कामे Construction of Nallah
|
1265.66
|
13800.00
|
15065.66
|
4
|
CE/M/2224
|
जल विद्युत प्रकल्प/सोलार प्रकल्प
|
750.00
|
4250.00
|
5000.00
|
5
|
CE/M/2219
|
धरण विकत घेणे प्रकल्प टप्पा-1 व 2/अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन घेणे/भिरा-भिवपुरी टाटा पॉवरहाऊस चे पाणी मोरबे जलप्रकल्पा पर्यंत आणणे
|
1325.00
|
675.00
|
2000.00
|
एकूण खर्च वाढ (+)
|
|
30000.00
|
|
तपशिल
|
मा.आयुक्तांनी प्रस्तावित केलेले अंदाज
|
मा.स्थायी समितीने सुचविलेली वाढ (+)
|
मा.स्थायी समितीचा अंदाज
|
अंदाजपत्रकीय खर्च
|
384891.00
|
30000.00
|
414891.00
|
अखेरची शिल्लक
|
109.00
|
--
|
109.00
|
अखेरच्या शिल्लकेसह एकूण अंदाजपत्रकीय खर्च
|
385000.00
|
30000.00
|
415000.00
|
- परिवहन उपक्रमास अनुदान :-
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत परिवहन सेवा उपक्रम कार्यान्वित आहे. सदर परिवहन सेवा सुदृढ करुन नागरिकांना अधिक चांगली प्रवासी सेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून परिवहन सेवेचे उत्पन्न वाढविणे व त्यासाठी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. स्थायी समितीने यामध्ये सन 2020-21 साठी रुपये 42 कोटी 75 लक्षची वाढ प्रस्तावित करुन एकूण रुपये 137 कोटी 75 लक्षची तरतूद केली आहे.
परिवहन उपक्रम डेपोकरीता जमीन विकत घेणे व डेपो विकसित करणे व भांडवली कामे :-
नवी मुंबई महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यासाठी वाशी से.9 येथील बस स्थानकाचा वाणिज्यिक विकास करण्यात येत असून त्याठिकाणी सुसज्ज अशी इमारत उभारुन बाह्य उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यात येणार आहे. याकरीता परिवहन उपक्रम डेपोकरीता जमीन विकत घेणे व त्याठिकाणी डेपो विकसित करणे गरजेचे आहे. त्याद्वारे परिवहनच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे असेही सूचित करण्यात येते की, परिवहन सेवेच्या बसेस, डेपो, बसस्टॉप, बसडेपोतील जागा जाहिरातींसाठी, होर्डींगसाठी देण्यात याव्यात. जेणेकरुन जाहिरातीपोटी मिळणा-या उत्पन्नात भरीव वाढ होईल आणि परिवहन सेवा सक्षम होण्यास मदत होईल. स्थायी समितीने यामध्ये सन 2020-21 साठी रुपये 70 कोटी तरतूद प्रस्तावित केली आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात अस्तित्वात असणारे बहुसंख्य पावसाळी नाले सिडकोने बांधलेले असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. याबाबत प्रशासनाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मोडलेल्या आणि मोडकळीस आलेल्या पावसाळी नाल्यांचे सर्व्हेक्षण करुन असे सर्व पावसाळी नाले एकाच वेळी संयुक्तरित्या एकात्मिक पध्दतीने आणि नवीन तंत्रज्ञानाने बांधण्यात यावेत. नाल्याच्या बाजूला हिरव्यागार झाडांनी सुशोभिकरण करण्यात यावे. शहराच्या मुख्य रस्त्यालगत जे छोटे नाले असतील, ते बंदिस्त करण्यात येऊन त्यावर अत्याधुनिक पद्धतीची वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबध्दरित्या केलेल्या सुविधा कामांमुळे व अंतर्गत गटारांच्या योग्य व्यवस्थेमुळे पावसाळी कालावधीत पाणी साचून नवी मुंबईचे जनजीवन विस्कळीत होत नसले तरी 'नाला व्हिजन' हाती घेऊन शहरातील नाल्यांची एकत्रित नुतनीकरण व सुधारणा करणे काळाची गरज आहे. वरील बाबी लक्षात घेऊन आणि जनतेच्या सुविधेसाठी सदर काम तातडीने करणे आवश्यक असल्यामुळे स्थायी समितीने हे काम युध्दपातळीवर करण्याचे सूचित केले असून त्यासाठी उघड्या नाल्यांची कामे या लेखाशीर्षाखाली सन 2020-21 साठी रुपये 138 कोटीची वाढ प्रस्तावित करुन मंजूर केले आहे.
- जल विद्युत प्रकल्प/सोलार प्रकल्प :-
पावसाळ्यात वाहणारे पाणी धरणामध्ये साठवले जाते. व नंतर तेच पाणी वापरले जाते. पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहणा-या पाण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्व आहे. कारण या प्रकारात स्थितीज उर्जा ही गतीज ऊर्जेत बदलते. या त-हेने केलेल्या विद्युतनिर्मितीला "जलविद्युत" असे म्हणतात. स्थायी समितीने जल विद्युत प्रकल्प/सोलार प्रकल्प या लेखाशिर्षाखाली सन 2020-21 साठी रुपये 42 कोटी 50 लक्षची वाढ प्रस्तावित करुन एकूण रुपये 50 कोटींची तरतूद केली आहे.
धरण विकत घेणे प्रकल्प टप्पा-1 व 2/अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन घेणे/भिरा-भिवपुरी टाटा पॉवरहाऊस चे पाणी मोरबे जलप्रकल्पा पर्यंत आणणे :-
धरण विकत घेणे प्रकल्प टप्पा-1 व 2/अतिरिक्त पाणी उपलब्ध करुन घेणे/ भिरा-भिवपुरी टाटा पॉवरहाऊस चे पाणी मोरबे जलप्रकल्पा पर्यंत आणणे या लेखाशिर्षाखाली स्थायी समितीने सन 2020-21 साठी रुपये 6 कोटी 75 लक्षची वाढ प्रस्तावित करुन एकूण रुपये 20 कोटीची तरतूद केली आहे.
आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणा-या नवी मुंबई शहराचा विकास अधिक अत्याधुनिक स्वरुपात होण्याच्या दृष्टीने मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्याकडे भर दिला पाहिजे. यामध्ये उर्वरित ठिकाणी मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे तसेच जलवाहिन्यांचे सर्वच ठिकाणी जाळे पसरवून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे उद्दिष्ट साकारण्यासाठी जलद प्रयत्न होणे आवश्यक आहे.
वाढत्या शहराला भेडसावणारी मुख्य वाहतुकीची समस्या सुरळीत होण्यासाठी उपलब्ध रस्ते अधिक चांगल्या प्रतीचे बनविणे गरजेचे आहे. तसेच आवश्यकतेनुसार उड्डाणपूल बांधून वाहतुक कोंडी टाळणे गरजेचे आहे.
आरोग्य सेवा हा नागरिकांच्या व शहराच्या विकासासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून शहरातील उपलब्ध सार्वजनिक रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांना आरोग्य सेवा पुरविणा-या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांची दुरुस्ती व विकास करुन तसेच त्याठिकाणी विविध आरोग्य साधने उपलब्ध करुन देऊन नागरिकांना घरापासून जवळच उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला पाहिजे.
'शिक्षण' या महत्वाच्या विषयाकडे बारकाईने लक्ष पुरवित शाळांमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध केली गेली पाहिजे. कार्यरत असलेल्या शिक्षकांचे माहिती- ज्ञान अद्ययावत करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन तसेच आवश्यकतेनुसार नवीन प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध करुन घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. चांगल्या इमारतींद्वारे अभ्यासाला उत्साहवर्धक वातावरण उपलब्ध करुन देण्यासोबतच संगणक शिक्षण, संगीत शिक्षण, क्रीडा शिक्षण देऊन सर्वांगीण गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत.
पर्यावरणपूरक गोष्टी अंमलात आणणे हेदेखील आपले कर्तव्य आहे. यादृष्टीने आवश्यक सोयीसुविधा यांचीही निर्मिती करण्यात यावी.
महानगरपालिकेच्या उद्यानात दिव्यांगांनाही खेळता यावे अशाप्रकारे डिझाईन केलेली विशेष खेळणी बसविण्यात यावीत.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी फेरीवाले अनधिकृतपणे आपला व्यवसाय करण्यासाठी बसत आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्याकरिता फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करुन त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अधिकृत परवाना देऊन जागा निश्चित करुन देणे गरजेचे आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये गाड्यांची झालेली प्रचंड वाढ, त्यापासून निर्माण झालेले प्रदूषण, एमआयडीसी परिसरातील कंपन्या, कारखाने, केमिकल्स कंपन्यांनी वाहत्या नाल्यात, खाडीत सोडलेले रसायनमिश्रीत केमिकल्स या सर्व बाबींमुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच पर्यावरणाचे संतुलनही बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कडकपणे पावले उचलणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने अद्ययावत यंत्रसामुग्री वापरुन शहर प्र
Published on : 11-03-2020 16:35:08,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update