पाणीपुरवठा विभागाचे जाहीर आवाहन
दिनांक 16 मार्च 2020 रोजी महाराष्ट राज्य विदुयत वितरण कपनी याचे मार्फ़त भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील 100/22 Kv सबस्टेशनचे देखभाल दुरुस्तीची काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा सोमवार दि.16 मार्च 2020 रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक 16 मार्च 2020 रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच मंगळवार दिनांक 17 मार्च 2020 रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.
Published on : 13-03-2020 13:35:31,Posted by : Navi Mumbai ,Category : News and update